सणासुदीच्या तोंडावर भाववाढीचा फटका
By admin | Published: October 18, 2016 07:49 PM2016-10-18T19:49:30+5:302016-10-18T19:49:30+5:30
ऐन सणासुदीला जीवनावश्यक वस्तुंच्या दरात झालेल्या वाढमुळे गृहिणींचे बजेट पुन्हा कोलमडणार असल्याचे दिसून येत आहे. दिवाळी सण मोठा
Next
>ऑनलाइन लोकमत
खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 18 - ऐन सणासुदीला जीवनावश्यक वस्तुंच्या दरात झालेल्या वाढमुळे गृहिणींचे बजेट पुन्हा कोलमडणार असल्याचे दिसून येत आहे. दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा अशा सर्वात मोठ्या सणाच्या तोंडावर विविध जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीमध्ये भाववाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये गत महिन्यात हरभरादाळीचे प्रतिकिलो भाव ८० ते ८५ रुपये किलो होते मात्र आता १२० ते १२५ रुपये किलो झाले आहेत. तसेच तूरदाळ १०० रुपयांच्यावर ११० ते ११५ रुपये किलो झाली आहे. साखरेनेही चाळीशी ओलांडली असून ४० ते ४२ रुपये प्रतिकिलो साखरचे भाव झाले आहेत. सोयाबीन तेलाचे दरात वाढ होवून ६८ वरुन ७५ रुपये किलो झाले आहेत तर शेंगदाणा तेल १२० वरुन १३५ रुपये लिटर झाले आहे.शेंगदाणे ९० वरुन शंभरच्यावर ११० ते १२० रुपये किलो, गूळ ४० ते ४५ वरुन ५० रुपये, साबुदाणा ४०-४२ वरुन ६० ते ६४, पोहे ३० रुपये वरुन ३५ रुपये, मैदा २२ वरुन २८ रुपये रवा २२ वरुन २८ रुपये, जिरा १६० रुपये प्रतिकिलोवरुन २४० रुपये झाले आहेत. तसेच इतर आवश्यक वस्तुंच्या दरातही वाढ झाली आहे. काही वस्तुंची भाववाढ प्रत्यक्षात दिसून येत नसली तरी वजनात घट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या वस्तुंच्या कच्च्या मालाचे दरात वाढ झाली नाही, अशा वस्तुंची सुध्दा चढ्या भावात महागाईचे नावाखाली विक्री होत असल्याचे बाजारपेठेत दिसून येत आहे. यामुळे ऐन दिवाळी सणाच्या काळात गृहिणींचे बजेट कोलमडणार असून दिवाळीत हा महागाईचा चटका सहन करावा लागणार आहे.