डाळींना महागाईचा ‘तडका’
By Admin | Published: May 17, 2015 01:45 AM2015-05-17T01:45:49+5:302015-05-17T01:45:49+5:30
गतवर्षीच्या तुलनेत खाद्यतेल व तांदळाच्या भावात घट झाली असली तरी डाळींचे भाव मात्र गगनाला भिडले आहेत. तसेच गहू व ज्वारीच्या भावातही काहीशी वाढ झालेली दिसून येते.
पुणे : गतवर्षीच्या तुलनेत खाद्यतेल व तांदळाच्या भावात घट झाली असली तरी डाळींचे भाव मात्र गगनाला भिडले आहेत. तसेच गहू व ज्वारीच्या भावातही काहीशी वाढ झालेली दिसून येते. दैनंदिन जीवनात सर्वाधिक मागणी असलेल्या डाळी, गहू व ज्वारी या अन्नधान्याचे भाव गतवर्षीच्या तुलनेत अधिक असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचत आहे.
अन्नधान्य व इंधनाच्या किमती कमी झाल्याने महागाई निर्देशांकात लक्षणीय घट नोंदविली गेली आहे. मात्र, सर्व अन्नधान्याचे भाव कमी झालेले नाहीत. दैनंदिन जीवनात नागरिकांना खाद्यतेलांसह तांदूळ, गहू, ज्वारी, डाळी या अन्नधान्याची सर्वाधिक गरज भासते. या अन्नधान्यांचे गतवर्षीचे घाऊक भाव आणि सध्याचे भाव विचारात घेतल्यास अजूनही महागाईने
त्यांची पाठ सोडली नसल्याचे
दिसते.
तूरडाळीचे भाव तर जवळपास दुपटीने वाढलले आहेत. मागील वर्षी मे महिन्यात तूरडाळीचे भाव क्लिंटलमागे ५८०० ते ६६०० रुपये एवढे होते. मागील आठवड्यात हे भाव ९,५०० ते १०,५०० वर जाऊन पोहोचले. हरभरा, मसूर, मटकी, उडीद या डाळींच्या भावातही सातत्याने वाढ होत आहे.
गतवर्षीच्या तुलनेत गव्हाच्या भावात क्विंटलमागे ८० ते ३०० रुपयांनी तर ज्वारीच्या भावात ५० ते २५० रुपयांनी वाढ झाली आहे. खाद्यतेलात शेंगदाणा तेलाचे भाव २५० ते २७५ रुपयांनी वाढले आहेत. सोयाबीन तेलाचा भाव मागील वर्षी मे महिन्यात १५ किलोमागे सरासरी ११३० ते १२०० रुपये एवढा होता. या वर्षी या भावात १२५ ते १५५ रुपये घट झाल्याचे दिसते. सूर्यफुल तेलाच्या भावात सुमारे ६० रुपयांची घट झाली आहे.
मुळातच देशांतर्गत डाळींचे उत्पादन कमी होत असल्याने भारताला आयातीवर अवलंबून राहावे लागते. चीन, टांझानिया, बर्मा, आॅस्ट्रेलिया या देशांतून मोठ्या प्रमाणावर डाळींची आयात होते. मात्र, भारतासह या देशांतील डाळींचे उत्पादनही घटले आहे. त्यामुळे डाळींच्या भावात वाढ झाली असून, हे भाव गतवर्षीच्या तुलनेने चढेच राहण्याची शक्यता आहे.
- विजय राठोड,
डाळींचे व्यापारी
मागील वर्षभरातील घाऊक बाजारभाव
मे १४सप्टेंबर १४जानेवारी १५मे १५
सोयाबीन तेल११३०-१२००९८०-१०८०१०५०-११५०९७५-१०७५
(१५ किलोमध्ये)
सूर्यफुल तेल१०९०-११९०९५०-१०८०१०००-११५०१०३०-११३०
शेंगदाणा तेल१३००-१४००१३००-१३७५१३७५-१४७५१५५०-१६७५
बासमती तांदूळ१३०००-१४०००१३०००-१४०००८५००-९०००८५००-९०००
(क्विंटलमध्ये)
कणी३४००-३६००३२००-३५००२४००-२६००२३००-२५००
कोलम३६००-४२००४२००-४५००४५००-४८००३३००-३७००
आंबेमोहर५५००-१०५००५८००-६५००५०००-६०००४३००-४६००
गहू १७२०-३७००१८००-३५५०१९००-३६००१८००-४०००
ज्वारी१९००-३४००२०००-३५००१८५०-३७००१८५०-३६५०
तूरडाळ५८००-६६००६५००-७४००७१००-८१००९५००-१०५००
हरभराडाळ३५००-४०००३७००-४२००४२००-४८००५८००-६३००
मसूरडाळ६३००-६४००६८००-७०००७५००-७६००७८००-८०००
मटकीडाळ७७००-७८००८०००-८२००८५००-८८००१००००-१०५००