डोंबिवलीत संघाचा प्राथमिक शिक्षा वर्ग!

By admin | Published: April 27, 2016 04:04 AM2016-04-27T04:04:58+5:302016-04-27T04:04:58+5:30

एमआयडीसी परिसरातील टिळकनगर महाविद्यालयात शनिवारपासून रा. स्व. संघ कल्याण विभागाच्या प्राथमिक संघ शिक्षा वर्गाला सुरुवात झाली

Primary education class of Dombivlit Sangha! | डोंबिवलीत संघाचा प्राथमिक शिक्षा वर्ग!

डोंबिवलीत संघाचा प्राथमिक शिक्षा वर्ग!

Next

डोंबिवली : एमआयडीसी परिसरातील टिळकनगर महाविद्यालयात शनिवारपासून रा. स्व. संघ कल्याण विभागाच्या प्राथमिक संघ शिक्षा वर्गाला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील १४४ स्वयंसेवक शिक्षार्थी म्हणून सहभागी झाले आहेत.
संघ रचनेनुसार त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी १५ शिक्षक तसेच व्यवस्थेसाठी सुमारे ४५ स्वयंसेवक उपस्थित आहेत. रविवार १ मे रोजी या वर्गाचा समारोप होणार आहे. सुमारे २१-२२ जणांचा १ गण असे ७ गण तयार करण्यात आले असून त्यामध्ये शिक्षार्थी विभागण्यात आले आहेत.
पहाटे ५.४५ पासून रात्री १०.३० पर्यंत शारीरिक, बौद्धिक तसेच मनोरंजनपर उपक्रम अशी दिनचर्या असल्याचे सांगण्यात आले. महाविद्यालयाच्या पटांगणात शारीरिक उपक्रम तसेच संध्याकाळचे संघस्थान आदी तर महाविद्यालयाच्या हॉलमध्ये अन्य उपक्रम एकत्रितपणे घेतले जातात. या वर्गासाठी संघाचे डोंबिवली शहर कार्यवाह विठ्ठल भट हे कार्यवाह तर बदलापूर येथील विवेक पाटील हे मुख्यशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. संघदृष्ट्या कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या पालघर, कल्याण आणि अंबरनाथ आदी परिसरातील स्वयंसेवकांचा या वर्गात समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Primary education class of Dombivlit Sangha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.