पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, विविध विकासकामांचा शुभारंभ होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 06:37 AM2019-02-16T06:37:47+5:302019-02-16T06:39:16+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी महाराष्ट्राच्या दौºयावर येत असून त्यांच्या हस्ते विदर्भ आणि खान्देशात विविध विकासकामांचा शुभारंभ होणार आहे.
यवतमाळ /जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी महाराष्ट्राच्या दौºयावर येत असून त्यांच्या हस्ते विदर्भ आणि खान्देशात विविध विकासकामांचा शुभारंभ होणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे सकाळी पंतप्रधानांच्या हस्ते एकलव्य मॉडेल स्कूलचे उद्घाटन होणार आहे. तसेच प्रधानमंत्री गृहनिर्माण योजनेतील लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या प्रदान करण्यात येतील. अजनी (नागपूर) ते पुणे रेल्वेचा ई-शुभारंभ, ग्रामोन्नती योजनेतील लाभार्र्थींना धनादेशाचे वाटप होणार आहे. त्यानंतर ते बचतगटांच्या मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी राज्यपाल के. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित असतील.
त्यानंतर ते धुळ्याकडे रवाना होतील. लोअर पांझरा मध्यम प्रकल्पाचे उद्घाटन, सुळवडे-जांफळ उपसा सिंचन योजना, धुळे शहराच्या पाणीपुरवठा योजना, धुळे-नारदा रेल्वे व जळगाव-मनमाड या रेल्वारील तिसºया लाईने भूमीपूजन होणार आहे.