पंतप्रधानांची ‘मन की बात’ प्रथमच लाइव्ह, महाराष्ट्रातील 'या' गावात लाइव्ह कार्यक्रम दाखवण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 12:46 PM2022-07-30T12:46:01+5:302022-07-30T13:37:00+5:30
आठ वर्षांत प्रथमच महाराष्ट्रातील एका गावात हा कार्यक्रम लाइव्ह दाखवण्याचा निर्णय पंतप्रधान कार्यालयाने घेतला आहे.
मिरज (सांगली): ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगलीतील हमाल व भाजी विक्रेत्या महिलांसोबत संवाद साधणार आहेत. माजी महापौर संगीता खोत यांच्या मिरजेतील किल्ला भागातील जनसंपर्क कार्यालयातून हमाल व भाजी विक्रेत्या महिला रविवार, दि. ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ‘मन की बात’मधून लाइव्ह सहभागी होणार आहेत. त्यांना पंतप्रधानांशी संवाद साधता येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली आठ वर्षे दर महिन्याच्या अखेरच्या रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशातील जनतेशी संवाद साधतात. आठ वर्षांत प्रथमच महाराष्ट्रातील एका गावात हा कार्यक्रम लाइव्ह दाखवण्याचा निर्णय पंतप्रधान कार्यालयाने घेतला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांच्यासह भाजप नेत्यांनी रविवारी कार्यक्रम पाहण्याचे आवाहन केले आहे. सांगलीतील ‘मन की बात’ कार्यक्रमाचे संयोजक शुभम कुलकर्णी आहेत.