पंतप्रधान मोदींचे खरे स्वच्छतादूत

By Admin | Published: April 14, 2017 06:40 PM2017-04-14T18:40:14+5:302017-04-14T18:52:16+5:30

योगेश पांडे नागपूर, दि. 14 : एरवी उन्हाळ्यातील एखादी सभा म्हटली की कार्यक्रमानंतर प्लॅस्टिकच्या बॉटल, पाणी पाऊच यांचा खच ...

Prime Minister Narendra Modi's true cleanman | पंतप्रधान मोदींचे खरे स्वच्छतादूत

पंतप्रधान मोदींचे खरे स्वच्छतादूत

Next

योगेश पांडे
नागपूर, दि. 14 : एरवी उन्हाळ्यातील एखादी सभा म्हटली की कार्यक्रमानंतर प्लॅस्टिकच्या बॉटल, पाणी पाऊच यांचा खच दिसून येतो. प्रशासनाकडून स्वच्छता होईलच या विचारातून लोक आपली जबाबदारी सोयीस्कररित्या विसरतात. मात्र महात्मा गांधी यांची स्वच्छतेशी शिकवण व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतसंदर्भात सुरू केलेली मोहिम यातून प्रेरणा घेऊन एका निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याने अनोखा पुढाकार घेतला. मानकापूर क्रीडा संकुल परिसरात मोदींच्या सभास्थळाबाहेरील परिसरात गजानन मारवाडे यांनी प्रशासनाची प्रतिक्षा न करता स्वत: लोकांनी फेकलेल्या पाण्याच्या रिकाम्या बॉटल्सउचलण्यास सुरुवात केली. सभा सुरू झाल्यापासून ते कार्यक्रम संपल्यानंतर त्यांचे हे काम अव्याहतपणे सुरू होते हे विशेष. मारवाडे हे मोदींचे खरे स्वच्छतादूत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.
नागपुरातील तापमान ४२ अंशांहून अधिक असले तरी भर दुपारी सभास्थळाबाहेरील ३ डोममध्ये हजारो लोक उपस्थित होते. उकाडा लक्षात घेता पंतप्रधानांच्या सभास्थळी प्रशासन तसेच उर्जा विभागाकडून पिण्याच्या सीलबंद बॉटल्सची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी २० हून अधिक काऊंटर्सदेखील लावण्यात आले होते. मात्र लोक पाणी पिल्यानंतर खुर्चीच्या शेजारी किंवा मोकळ््या जागेत बॉटल्स फेकत होते.
कचरा उचलण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी किंवा सफाई कर्मचारी दिसून आले नाही. परंतु अचानक डोक्यावर गांधी टोपी घातलेले मारवाडे मोठी थैली घेऊन आले व कुणाशीही काहीही न बोलता लोकांच्या पायाशी पडलेल्या रिकाम्या ह्यबॉटल्सह्णचा कचरा उचलायला लागले. त्यांच्या या कृतीने मंडपातील नागरिकांचे लक्ष वेधले गेले. अनेकांना ते मनपाचे कर्मचारी वाटले तर काहींना सफाई कर्मचारी. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्यातून २ महिन्यांपूर्वीच निवृत्त झालेल्या मारवाडे यांना याचे वाईट वाटले नाही. ते एखाद्या मिशनप्रमाणे आपले काम करत होते. कार्यक्रम झाल्यानंतरदेखील ते बॉटल्स गोळा करताना दिसून आले. परिसरातून त्यांनी २ तासात हजारो ह्यबॉटल्सह्ण उचलल्या. विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात काही लहान मुलांनीदेखील त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन हा कचरा गोळा करण्याचा प्रयत्न केला.

मी देशाचा नागरिक, ही जबाबदारीच
यासंदर्भात गजाजन मारवाडे यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता त्यांनी आपली ओळख सांगितली. मी मनपाचा सफाई कर्मचारी नाही. मात्र देशाचा नागरिक आहे व स्वच्छता राखणे ही माझी जबाबदारी आहे. इतर लोक जबाबदारी झटकतात म्हणून मी का दुर्लक्ष करायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील पुस्तक प्रकाशनादरम्यान कापलेली रिबिन स्वत:च्या खिशात ठेवतात. त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन कृतीतून समाजाला संदेश देण्याचा माझा प्रयत्न असतो, असे मारवाडे यांनी सांगितले.

https://www.dailymotion.com/video/x844voz

Web Title: Prime Minister Narendra Modi's true cleanman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.