पंतप्रधान म्हणाले, तु काय होणार ?

By admin | Published: July 12, 2014 10:09 PM2014-07-12T22:09:48+5:302014-07-12T22:09:48+5:30

संस्कार मोतीने दिली संधी : मोदींच्या भेटीने भारावला खामगावचा आदित्य

The Prime Minister said, what will happen to you? | पंतप्रधान म्हणाले, तु काय होणार ?

पंतप्रधान म्हणाले, तु काय होणार ?

Next

खामगाव: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली तेव्हापासून नरेंद्र मोदी हे नाव आणि या नावाची व्यक्ती मी सतत टीव्हीवर पाहत होतो. पुढे ते देशाचे पंतप्रधान झाले अन् त्यांचा टीव्हीवरचा वावर आणखी वाढला. तेव्हापासून या व्यक्तीप्रति एक वेगळेच आकर्षण वाटायला लागले. पंरतु भविष्यात कधी आपण त्यांना थेट भेटू शकू, असे स्वप्नांतही वाटले नाही. लोकमतच्या ह्यसंस्कार मोतीह्ण या स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्यातून विजयी झालो अन् ही संधी माझ्याकडे चालून आली. संसदेच्या परिसरात पंतप्रधान मोदी माझ्या समोर होत चक्क मराठीत विचारत होते, तु मोठा झाल्यावर काय होणार? मला तर अजूनही तो क्षण स्वप्नवतच वाटतो, अशा शब्दात नागपूरच्या आदित्य राजेंद्र देशमुख याने आज शनिवारी आपल्या भावना लोकमतकडे व्यक्त केल्या.

** लोकमतने दिली संधी

आदित्यचे वडील राजेंद्र देशमुख म्हणाले, आदित्य लहान असल्यापासूनच लोकमतच्या विविध स्पर्धेत सहभागी होतो. गेल्याकाही वर्षांपासून तो दरवर्षी नियमित संस्कार मोती स्पर्धेत सहभागी होत आहे. लोकमतमुळे आदित्यला पंतप्रधानांशी भेटण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. पंतप्रधानपदी आल्यानंतर प्रथमच मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यात माझा मुलगा आहे. याचा मला अभिमान आहे. एवढा मोठा गोल्डन चान्स केवळ लोकमतमुळे मिळाला.

** क्षणाक्षणाला वाढत होती उत्सुकता

आपल्या मोदी भेटीचे वर्णन करताना आदित्य म्हणाला, शेगाव येथून ट्रेनने नागपूर येथे पोहोचलो. सकाळी नागपूरच्या विमानतळावरून प्रवास सुरू होताच मनाची घालमेल सुरू झाली. पंतप्रधानांना भेटल्यावर आपण काय बोलावे हा प्रश्न सतावत होता. १ तास ४२ मिनीटांचा प्रवास संपवून दिल्ली विमानतळावर पोहोचल्यावर मनाची धाकधूक जरा जास्तच वाढली होती.

** आई-वडिल, प्राचार्यांनी दिले प्रोत्साहन

विविध स्पर्धांमध्ये भाग घेवून यशस्वी होण्यासाठी आई सीमा देशमुख, वडील राजेंद्र, काका धनंजय, काकू धनश्री, प्राचार्या सुवर्णा जळगावकर, शिक्षकवृंद दिपाली नायसे, संदीप घाटे यांचा मोलाचा वाटा आहे.

** मोठ्ठी संसद अन खूप गर्दी बसमध्ये

आम्ही सर्व विजयी स्पर्धक व लोकमतच्या कर्मचार्‍यांनी राजधानीतील विविध वास्तू दाखविल्या. इंडिया गेट, राष्ट्रपती भवन पाहिल्यावर संसदेत दाखल झालो. एवढी मोठी गोल व उंच इमारत पहिल्यांदाच पाहिली. आज काही तरी खास असावे असे वाटत होते. खूप लोक हातात कॅमेरे व माईक घेवून उभे होते. संसदेत खूप लोक होते. आम्ही सर्व विद्यार्थी एका खोलीत दाखल झालो. काही वेळातच काही गार्ड आले त्यांनी सर्व फेरफटका मारला. त्यानंतर काही वेळाने आमची पंतप्रधानांशी भेट झाली.

Web Title: The Prime Minister said, what will happen to you?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.