पंतप्रधान ग्रामसडक योजना, राज्यातील गावांना जोडणार २८ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 07:06 AM2020-10-26T07:06:26+5:302020-10-26T07:07:48+5:30
Maharashtra News : महाराष्ट्रातील गावांना रस्त्यांनी जोडण्यासाठी एकूण २८,०८३ किलोमीटर मार्गाचे जाळे प्रस्तावित आहे. पंतप्रधान ग्राममसडक योजनेंतर्गत ६ हजार ०५५ रस्त्यांचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील गावांना रस्त्यांनी जोडण्यासाठी २८ हजार किलोमीटरपेक्षा जास्त रस्त्यांचे तसेच ९१० पेक्षा अधिक पूलांचे जाळे उभारले जाणार
आहे. पंतप्रधान मोदींचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या योजनांपैकी एक पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत राज्यात आतापर्यंत सुमारे २७ हजार किलोमीटर रस्त्यांचे काम पूर्ण झालेले आहे. नक्षलप्रभावित गडचिरोली, पूणे, अहमदनगर आणि नाशिक येथे उभारल्या जात असलेल्या सर्वाधिक लांबीच्या रस्त्यांचा यात समावेश आहे.
महाराष्ट्रातील गावांना रस्त्यांनी जोडण्यासाठी एकूण २८,०८३ किलोमीटर मार्गाचे जाळे प्रस्तावित आहे. पंतप्रधान ग्राममसडक योजनेंतर्गत ६ हजार ०५५ रस्त्यांचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. रस्तेबांधणीसाठी सुमारे ८.६७ लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ग्रामीण विकास
मंत्रालयाच्या आकडेवारीरीनुसार यात गडचिरोलीमध्ये सर्वाधिक १७९५ किलोमीटरचे ३२० रस्ते आणि १२८ पूल,
१५७३ किलोमीटर लांबीच पूल आणि २७८ रस्ते आणि १६ पूल, १४०८ किलोमीटरचे २२५ रस्ते
आणि १९ पूल, १३६० किलोमीटर लांबीचे २३२ रस्ते आणि ३० पूल उभारले जाणार
आहेत
मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, सांगितले की, पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील कोअर नेटवर्कमधील रस्ते नाहीत, अशा गावात वर्षभर वापरता येतील असे रस्ते बांधण्याची योजना आहे. रस्त्याच्या उभारणीत नक्षलवादी कारवाया, वनविभागाची मंजुरी, ठेकेदारी प्रक्रिया, ठेकेदारांकडून मिळणारा अल्प प्रतिसास याारख्या अनेक अडचणींचा सामना सरकारला करावा लागत आहे. विशेषकरून ग़डचिरोली, नंदुरबारसारख्या जिल्ह्यात समस्या भेडसावत आहेत.