कॅन्सरच्या उपचारासाठी पंतप्रधानांनी दिली मदत

By admin | Published: December 23, 2016 08:44 PM2016-12-23T20:44:02+5:302016-12-23T20:44:02+5:30

हालाखिच्या परिस्थितीत जीवन जगत असताना साक्री शहरातील एका व्यक्तीच्या पत्नीला कॅन्सर झाल्याचे निष्पन्न झाले. या रोगाचे निदान करण्यासाठी ६ लाख रुपये खर्च डॉक्टरांनी

Prime Minister's help for cancer treatment | कॅन्सरच्या उपचारासाठी पंतप्रधानांनी दिली मदत

कॅन्सरच्या उपचारासाठी पंतप्रधानांनी दिली मदत

Next

ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. 23 -  हालाखिच्या परिस्थितीत जीवन जगत असताना साक्री शहरातील एका व्यक्तीच्या पत्नीला कॅन्सर झाल्याचे निष्पन्न झाले. या रोगाचे निदान करण्यासाठी ६ लाख रुपये खर्च डॉक्टरांनी सांगितल्यानंतर या कुटुंबीयांच्या मदतीला साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी धावून आले. त्यांनी या महिलेच्या उपचारासाठी १ लाख ७५ हजार रुपयांची तातडीची मदत दिली आहे. साक्री (जि. धुळे) शहरातील कैलास मोरे यांची ही कहाणी....
चार जणांचे सुखी कुटुंब. त्या कुटुंबाचा गाडा रेटण्यासाठी दिवसभर कैलास मोरे लोटगाडीवर चणे, फुटाणे व शेंगदाणे विकून कुटुंबातील सदस्यांचा उदरनिर्वाह करतात. त्यांना मनीषा (इयत्ता ७ वी) व लोकेश (इयत्ता ४ थी) ही दोन मुले आहेत. त्यांची पत्नी सिंधूबाई या मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा पुढे रेटण्यासाठी त्यांचे पती कैलास यांना मदत करतात. परंतु, गेल्या महिन्यांपूर्वी सिंधूबाई यांची प्रकृती बिघडली. त्यांची तपासणी केली असता त्यांना कॅन्सर असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. कॅन्सरवर उपचार करणे महागडे असल्याने समाजबांधवांनी व काही दानशूर लोकांनी त्यांना मदत केली. परंतु, त्यांच्या उपचारासाठी सहा लाख रुपये खर्च येणार होता. जमलेल्या पैशातून मुंबई येथे टाटा हॉस्पिटलमध्ये सिंधूबाई यांच्यावर उपचार सुरू होते. पैशांची चणचण असल्याने कैलास यांनी सरळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले; व मदतीचे आवाहन केले. हे पत्र नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. हीना गावीत यांच्याकडे दिल्यावर त्यांनी ते त्वरित पंतप्रधान कार्यालयात पाठवले.

हॉस्पिटलच्या नावावर पैसे वर्ग
पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहीचे एक पत्र कैलास मोरे यांना पाठवले. या पत्रात पत्नीच्या उपचारासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीतून १ लाख ७५ हजार रुपये मंजूर केले. ही रक्कम टाटा कॅन्सर हॉस्पिटलकडे वर्ग करण्यात आली आहे. याबरोबर पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या पत्रात कैलास यांच्या पत्नीची प्रकृती बरी होईल, अशा शुभकामना पाठवल्या आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली मदतीमुळे मोरे परिवाराने त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Web Title: Prime Minister's help for cancer treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.