दोन लिपिकांसह प्राचार्य कोठडीत

By admin | Published: March 31, 2016 12:40 AM2016-03-31T00:40:56+5:302016-03-31T00:40:56+5:30

बारावीच्या विविध विषयांत पुनर्लिखित उत्तरपत्रिकांद्वारे गुणवाढ करून देणाऱ्या रॅकेटमधील परीक्षा मंडळाचे लिपिक दिलीप ब्रह्मपुरीकर, प्रशांत देऊळगावकर व वाटूरफाटा येथील महंत

Principal prisoner with two clerks | दोन लिपिकांसह प्राचार्य कोठडीत

दोन लिपिकांसह प्राचार्य कोठडीत

Next

जालना : बारावीच्या विविध विषयांत पुनर्लिखित उत्तरपत्रिकांद्वारे गुणवाढ करून देणाऱ्या रॅकेटमधील परीक्षा मंडळाचे लिपिक दिलीप ब्रह्मपुरीकर, प्रशांत देऊळगावकर व वाटूरफाटा येथील महंत रामगिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य संजय प्रभाकर शिंदे या तिघांना बुधवारी न्यायालयाने एक एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर श्रीमंत वाघ, शिवनारायण कायंदे आणि राजेंद्र पाटील या तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
जालना शहरातील अंबड रस्त्यावरील संस्कार वसतिगृहावर पोलिसांनी १८ मार्च रोजी रात्री छापा टाकून २ हजार ५०० पुनर्लिखित उत्तरपत्रिका आणि तब्बल ५ हजार कोऱ्या उत्तरपत्रिका आणि तितकेच होलोक्राफ्ट जप्त केले होते. या प्रकरणात आतापर्यंत पंधरा जणांना अटक झाली आहे. परीक्षा मंडळाच्या सहा लिपिकांचा समावेश असून, प्राध्यापक, प्राचार्याचाही सहभागही उघड झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Principal prisoner with two clerks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.