राज्यातील प्रस्थापित अधिका:यांच्या बदल्या
By admin | Published: December 9, 2014 02:11 AM2014-12-09T02:11:02+5:302014-12-09T02:11:02+5:30
मुंबई-पुण्यातच राहणा:या प्रस्थापित महसूल अधिका:यांच्या बदल्यांचे तडकाफडकी फर्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले
Next
यदु जोशी ल्ल नागपूर
गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया अन् एकूणच विदर्भात बदलीच्या ठिकाणी जाण्यास टाळाटाळ करून मुंबई-पुण्यातच राहणा:या प्रस्थापित महसूल अधिका:यांच्या बदल्यांचे तडकाफडकी फर्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले असून, बदलीच्या ठिकाणी आठ दिवसांत रुजू व्हा नाही तर निलंबनाला तयार राहा, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आल्याने अधिका:यांमध्ये खळबळ माजली आहे.
5 अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि तब्बल 2क् उपजिल्हाधिका:यांची गेल्या दोन दिवसांत विदर्भात बदली करण्यात आली आहे. या अधिका:यांच्या नावांवर नजर टाकली तर
त्यांचे राजकीय लागेबांधे, अधिका:यांची लॉबी करून दबावतंत्रचा अवलंब करणारे हे अधिकारी आपल्या मर्जीनुसार
पोस्टिंग मिळवित आले असल्याचे दिसते. या अधिका:यांना मुख्यमंत्र्यांनी चाप लावला आहे. हे अधिकारी
रुजू झाले नाही तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईही केली जाणार आहे.
दोन वर्षापूर्वीही अधिका:यांच्या बदल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्या होत्या पण त्यापैकी अनेक जण रुजू झाले नाहीत. काहींनी
वर्षभर रजा घेतली आणि नंतर आपल्या सोईनुसार पोस्टिंग मिळवून घेतले होते. आता असे प्रकार मुळीच खपवून घेऊ नका, कुणाचीही गय
करू नका, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक जणांना विदर्भात
किंवा मराठवाडय़ात पाठविले जात आहे. या दोन्ही भागांमध्ये
महसूल विभागाचे कामकाज ढेपाळले आहे. कारण, एका अधिका:याकडे तीन-चार पदाचे चार्ज आहेत. त्यावर पर्याय म्हणून अधिका:यांची पदे भरणो सुरू झाले आहे. नागपूर विभागात अतिरिक्त जिल्हाधिका:यांची 2 आणि उपजिल्हाधिका:यांची 15 रिक्त पदे होती. अमरावती विभागात अतिरिक्त जिल्हाधिका:यांची 3 तर उपजिल्हाधिका:यांची 14 पदे रिक्त होती.
नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले अतिरिक्त जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांना अमरावती विभागाचे पुरवठा उपायुक्त म्हणून पाठविले आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी बी.जे.पाटील हेही नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. त्यांना अमरावतीचे पुनर्वसन उपायुक्त म्हणून धाडण्यात आले. अतिरिक्त जिल्हाधिकारी गणोश पाटील हेही नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. त्यांची रवानगी याच पदावर वाशिमला करण्यात आली. नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हेमंत पवार यांची रवानगी नागपुरातच रोहयोचे उपायुक्त म्हणून करण्यात आली. सिडको; मुंबईत अतिरिक्त जिल्हाधिकारी असलेले डी.बी.जायभाये यांना गोसेखुर्द प्रकल्पाचे उपायुक्त म्हणून पाठविले आहे.
आता मराठवाडय़ाचा नंबर
मराठवाडय़ातील अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिका:यांची रिक्त पदे भरण्यासाठी इतर विभागातील अधिका:यांची बदली येत्या दोन दिवसांत करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई-पुण्याच्या आणखी काही अधिका:यांना आता मराठवाडय़ात फेकले जाईल.
शरद पाटील - उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अकोला (सहायक प्राध्यापक यशदा पुणो), विजय भाकरे - उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यवतमाळ (प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी नागपूर), एस.एस.फडके - उपजिल्हाधिकारी (भूसंपादन; लाभक्षेत्र) यवतमाळ (गुजरात स्टेट पेट्रोनेट लि. येथे प्रतिनियुक्तीवर होते.), संतोष पाटील - उपजिल्हाधिकारी; यवतमाळ (प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी नांदेड), पुरुषोत्तम जाधव - उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) बुलडाणा (आधी उद्योग मंत्री नारायण राणोंकडे होते. नंतर उपजिल्हाधिकारी नागपूर पदावर गेले), त्रिगुण कुलकर्णी - उपजिल्हाधिकारी बुलडाणा (उपजिल्हाधिकारी सोलापूर), सत्यनारायण बजाज -उपजिल्हाधिकारी वाशिम (नियुक्तीच्या प्रतीक्षेत), अनिल पवार - उपजिल्हाधिकारी बुलडाणा (नियुक्तीच्या प्रतीक्षेत). अविनाश कातडे - उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण) चंद्रपूर (मंत्री आस्थापनेवरून प्रत्यावर्तीत विभागात रुजू आदेश सादर केलेला नाही), अशोक चौधरी -उपजिल्हाधिकारी (रोहयो) चंद्रपूर (उपजिल्हाधिकारी राजशिष्टाचार नागपूर), सारंग कोडोलेकर - उपजिल्हाधिकारी एटापल्ली, जि.गडचिरोली (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत), सुधीर जोशी - उपजिल्हाधिकारी भंडारा (उपजिल्हाधिकारी हिंगोली), जयंत पिंपळगावकर - उपजिल्हाधिकारी (रोहयो) गडचिरोली (प्रबंधक यशदा पुणो), अनिल पाटील उपजिल्हाधिकारी गोंदिया (सिडको; नवी मुंबई), आर.टी.शिंदे - उपजिल्हाधिकारी (रोहयो) गोंदिया (पुणो महापालिका उपायुक्त), अविनाश शिंदे - उपजिल्हाधिकारी (गोसेखुर्द) भंडारा (झोपडपट्टी पुनर्वसन, पुणो), बाळासाहेब कोळेकर - उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) गडचिरोली (प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी), दीपक नलावडे - विशेष भूसंपादन अधिकारी, भंडारा (विभागीय अधिकारी महाऊर्जा कोल्हापूर), सज्रेराव सोनावणो - विशेष भूसंपादन अधिकारी वर्धा (उपनियंत्रक, शिधावाटप ठाणो), संजय जाधव - जिल्हा पुनर्वसन अधिकारी, वर्धा (उपजिल्हाधिकारी, हिंदुस्थान पेट्रोलियम लि.पुणो). (कंसात आधीची पदे)