‘तत्वत:’ शब्दाला शिवसेनेचा विरोध

By admin | Published: June 12, 2017 02:14 AM2017-06-12T02:14:54+5:302017-06-12T02:14:54+5:30

शेतकरी कर्जमाफीतील ‘तत्वत:’ या शब्दाला शिवसेनेचा विरोध असल्याचे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले़

The principle of 'principle:' is the opposition of the Shiv Sena | ‘तत्वत:’ शब्दाला शिवसेनेचा विरोध

‘तत्वत:’ शब्दाला शिवसेनेचा विरोध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शेतकरी कर्जमाफीतील ‘तत्वत:’ या शब्दाला शिवसेनेचा विरोध असल्याचे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले़
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील मंत्रीगटाचा निर्णय हा तात्काळ कॅबिनेटच्या बैठकीत आला पाहिजे. शेतकऱ्यांची ज्यावेळेस संपूर्ण कर्जमाफी होईल, त्याचवेळेस शेतकऱ्यांनी दिलेल्या लढ्याचा विजय ठरेल़ शेतकऱ्यांचा सातबारा ज्यावेळेस कोरा होईल, त्यावेळेस खऱ्या अर्थाने शिवसेना विजयोत्सव साजरा करेल़ सरसकट कर्जमाफीची घोषणा झाली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली़ राऊत म्हणाले की, शिवसेनेमुळेच राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरला. त्यात शेतकऱ्यांना मिळालेल्या कर्जमुक्तीचे श्रेय दुसऱ्या कोणाचे नाही. ते शिवसेनेचे आहे.

Web Title: The principle of 'principle:' is the opposition of the Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.