औषधांच्या कॉल सेंटरवर छापा

By admin | Published: April 2, 2016 02:14 AM2016-04-02T02:14:57+5:302016-04-02T02:14:57+5:30

आॅनलाइन फार्मसीद्वारे मुंबईतून अमेरिका, कॅनडा, आॅस्ट्रेलिया या देशांत सिल्डिनाफिल, टाडानाफिल, व्हेल्डेनाफिलयुक्त शक्तिवर्धक औषधांची किरकोळ विक्री करणाऱ्या बेकायदेशीर कॉल सेंटरवर

Print on the drug call center | औषधांच्या कॉल सेंटरवर छापा

औषधांच्या कॉल सेंटरवर छापा

Next

मुंबई : आॅनलाइन फार्मसीद्वारे मुंबईतून अमेरिका, कॅनडा, आॅस्ट्रेलिया या देशांत सिल्डिनाफिल, टाडानाफिल, व्हेल्डेनाफिलयुक्त शक्तिवर्धक औषधांची किरकोळ विक्री करणाऱ्या बेकायदेशीर कॉल सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) दक्षता पथकाने छापा घालून औषधे व प्रसाधने कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
चांदिवली येथील व्हिबझ टेली सर्व्हिसेस प्रा.लि. या संस्थेद्वारे औषधांची बेकायदेशीर विक्री करण्यात येत होती. या संस्थेतून परदेशात शक्तिवर्धक औषधांची विक्री होत असल्याची माहिती एफडीएच्या दक्षता विभागाला मिळाली होती. त्यानंतर या कंपनीवर पाळत ठेवून छापा घालण्यात आला. त्या वेळी कंपनीच्या कार्यालयात ७० ते ८० आॅपरेटर कार्यरत होते. हे आॅपरेटर अमेरिका, कॅनडा, आॅस्ट्रेलिया आणि जर्मनी या देशांतील ग्राहकांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधत होते. त्यांच्याकडून सिल्डिनाफिल, टाडानाफिल, व्हेल्डेनाफिलयुक्त औषधांची ३०, ६०, ९०, १०० आणि ४०० नगांची औषधांची आॅर्डर घेताना दिसत होते. प्रत्येक आॅपरेटरला प्रत्येक शिफ्टमध्ये किमान २०० डॉलरची आॅर्डर घेण्याचे बंधनकारक आहे, असे चौकशीदरम्यान समजले. यापैकी कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतल्यास त्याचे दुष्परिणाम होतात.
औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० अंतर्गत आवश्यक असलेले कोणतेही परवाने या कंपनीकडे नव्हते. संस्थेत उपस्थित असलेल्या व्यक्तींनी विक्री करत असलेल्या औषधांची खरेदी, साठवणूक आणि व्रिकी-वितरणासंदर्भातील कोणतीही आवश्यक माहिती, संबंधित कागदपत्रे पडताळणीसाठी उपलब्ध केलेली नाहीत. त्यामुळे या संस्थेला नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील तपासणी सुरू असल्याचे एफडीए आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेतल्यास होणारे दुष्परिणाम
दृष्टी जाणे, कानात घणघण आवाज होणे, श्रवणशक्ती लोप पावणे, छातीत वेदना होणे, शरीर जड वाटणे, खांद्याला दुखापत, हृदयात धडधडणे, हात-पाय, घोट्याला सूज येणे, चक्कर येणे

Web Title: Print on the drug call center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.