उल्हासनगरात कुंटणखान्यावर छापा
By admin | Published: May 18, 2015 04:08 AM2015-05-18T04:08:50+5:302015-05-18T04:08:50+5:30
उल्हासनगरच्या भाजी मार्केट येथील एका कुंटणखान्यातून गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक पथकाने दोन पीडित
ठाणे : उल्हासनगरच्या भाजी मार्केट येथील एका कुंटणखान्यातून गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक पथकाने दोन पीडित महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी गीता रामचंद्र डेंबा (५७) हिला अटक करण्यात आली.
गरीब मुलींना पैशांचे आमिष दाखवून गीता ही काही मुलींकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, बनावट गिऱ्हाईक पाठवून पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शकील शेख, उपनिरीक्षक शरद पंजे आदींच्या पथकाने १४ मे रोजी बरॅक क्र. ८७८, सेक्शन १८, भाजी मार्केट भागातील एका घरात धाड टाकली. पोलिसांच्या छाप्यात शरीरविक्रीचा प्रकार उघड झाल्यानंतर तिला अटक करून दोन्ही महिलांची सुटका करण्यात आली आहे. न्यायालयाने तिला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)