आधी शिक्षणातून करिअर करा, मगच राजकारणात या; मुख्यमंत्र्यांनी दिला चिमुकल्यांना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 05:42 AM2019-02-26T05:42:25+5:302019-02-26T05:42:28+5:30

मुंबई : शिक्षणानेच माणूस घडतो. शिक्षणातून संस्कार मिळतात. जीवनात निर्भीडपणे उभे राहण्याचा प्रयत्न करा. आधी शिक्षणातून करिअर करा. मग ...

Prior to education, then only in politics; The advice of the Chief Minister to the sparrows | आधी शिक्षणातून करिअर करा, मगच राजकारणात या; मुख्यमंत्र्यांनी दिला चिमुकल्यांना सल्ला

आधी शिक्षणातून करिअर करा, मगच राजकारणात या; मुख्यमंत्र्यांनी दिला चिमुकल्यांना सल्ला

Next

मुंबई : शिक्षणानेच माणूस घडतो. शिक्षणातून संस्कार मिळतात. जीवनात निर्भीडपणे उभे राहण्याचा प्रयत्न करा. आधी शिक्षणातून करिअर करा. मग राजकारणात या, अशी दिलखुलास उत्तरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिली.


औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वरवंडी तांडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी आयुष्यातील पहिला विमान प्रवास करून मुंबईत पोहोचले. राज्यातील आयएसओ मानांकनप्राप्त शाळा असा लौकिक असलेल्या या शाळेतल्या या चिमुकल्यांना थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

यानिमित्ताने विधान भवनाच्या समिती सभागृहात या चिमुकल्यांनी फडणवीस यांची अनौपचारिक मुलाखत घेत एकामागून एक अशा प्रश्नांची धमाल उडवून दिली. तुम्ही पहिल्यांदा विमानातून प्रवास कधी केला? तुम्हाला भीती नाही वाटली? शालेय जीवनातील मजेशीर किस्से सांगा? इथपासून ते सर! शहर स्मार्ट करताय, मग आमच्या गावांचं काय? आम्ही राजकारणात यावे काय? आम्ही शिकू, पण नोकऱ्या मिळतील काय? दुष्काळासाठी काय मदत करत आहात? ऊसतोड मजुरांसाठी काय योजना आहेत? अशा संवेदनशील प्रश्नांनासुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तरे देत मार्गदर्शनही केले.

Web Title: Prior to education, then only in politics; The advice of the Chief Minister to the sparrows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.