कंत्राटी कोविड आरोग्य कर्मचाऱ्यांना भरतीत प्राधान्य; सरकारचे सचिवांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 06:39 AM2022-09-13T06:39:36+5:302022-09-13T06:40:06+5:30

गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कोविड काळात राज्यात आरोग्य क्षेत्रात अनेक जणांनी कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा दिली आहे

Priority in Recruitment of Contractual Covid Health Workers; Instructions to the Secretary to Govt | कंत्राटी कोविड आरोग्य कर्मचाऱ्यांना भरतीत प्राधान्य; सरकारचे सचिवांना निर्देश

कंत्राटी कोविड आरोग्य कर्मचाऱ्यांना भरतीत प्राधान्य; सरकारचे सचिवांना निर्देश

Next

मुंबई : कोविड काळात राज्यात मागील दोन ते अडीच वर्षात कंत्राटी कामगार म्हणून वैद्यकीय सेवा बजावलेल्यांना आरोग्य विभागाच्या भरतीत प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी या कंत्राटी सेवा बजावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंद घेऊन त्यांचे गुणांकन करण्याची कार्यपद्धती मुख्य सचिवांनी ठरवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. 

गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कोविड काळात राज्यात आरोग्य क्षेत्रात अनेक जणांनी कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा दिली आहे. यात वैद्यकीय सहायक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोविड काळात जीवावर उदार होऊन या कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली आहे.

Web Title: Priority in Recruitment of Contractual Covid Health Workers; Instructions to the Secretary to Govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.