केअर वर्ल्ड वरील बंदीस २४ नोव्हेंबरपर्यंत स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2016 06:02 AM2016-11-09T06:02:16+5:302016-11-09T06:02:16+5:30

आक्षेपार्ह बाबी दाखवल्याने केंद्र सरकारने आरोग्याविषयी माहिती देणाऱ्या केअर वर्ल्ड टीव्ही या चॅनेलवर वर सात दिवस प्रसारणबंदी घातली

Prison Break on Care World | केअर वर्ल्ड वरील बंदीस २४ नोव्हेंबरपर्यंत स्थगिती

केअर वर्ल्ड वरील बंदीस २४ नोव्हेंबरपर्यंत स्थगिती

Next

मुंबई : आक्षेपार्ह बाबी दाखवल्याने केंद्र सरकारने आरोग्याविषयी माहिती देणाऱ्या केअर वर्ल्ड टीव्ही या चॅनेलवर वर सात दिवस प्रसारणबंदी घातली. या बंदीविरुद्ध चॅनलने उच्च न्यायालयात धाव घेतली. सुटीकालीन न्यायालयाने सरकारच्या निर्णयावर २४ नोव्हेंबरपर्यंत स्थगिती दिली.
केअर वर्ल्ड टी.व्ही चॅनेल २४*७ असून या चॅनेलवर आरोग्याविषयी माहिती देण्यात येते. गेले दहा वर्षे हा चॅनेल सुरू असल्याचे चॅनेलचे अध्यक्ष अतुल सराफ यांनी न्यायालयाला सांगितले. माहिती व प्रसारण मंत्रालयाने घातलेल्या सात दिवसांच्या बंदीवर न्या. एम. एस. कर्णिक यांनी २४ नोव्हेंबरपर्यंत स्थगिती दिली. आयएमसीच्या शिफारशीनुसार माहिती व प्रसारण मंत्रालयाने सात दिवसांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. ९ नोव्हेंबरपासून ही बंदी लागू करण्यात येणार होती. मात्र आता चॅनेलला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Prison Break on Care World

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.