येरवडा कारागृहातून कैदी पसार

By admin | Published: July 15, 2015 01:49 AM2015-07-15T01:49:36+5:302015-07-15T02:30:10+5:30

जेलमधून सुटका होण्यासाठी ८ ते १० दिवस राहिले असताना किरकोळ चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या कैद्याला खुल्या कारागृहातून पळून जाण्याची दुर्बुद्धी झाली

Prisoner escapes from Yerwada Jail | येरवडा कारागृहातून कैदी पसार

येरवडा कारागृहातून कैदी पसार

Next

पुणे : जेलमधून सुटका होण्यासाठी ८ ते १० दिवस राहिले असताना किरकोळ चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या कैद्याला खुल्या कारागृहातून पळून जाण्याची दुर्बुद्धी झाली. तो पकडला गेल्यास पळून जाण्याच्या शिक्षेपेक्षा जास्त, दोन वर्षांची शिक्षा त्याला होऊ शकेल. आज दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार झाला.
राम गजानन जाधव (वय ३०, सुगाव, पोस्ट कुंबेफळ, ता. अकोले, जि. नगर) असे त्याचे नाव आहे. तो सहा महिन्यांपासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याचा बंदी क्रमांक ३७७७५ असा आहे.
कारागृहातील मुख्य बागेत, तटाजवळ साफसफाईचे काम करीत असताना तो कारागृहरक्षकाची नजर चुकवून पसार झाला. कारागृहाचे हवालदार एस. माळसकर यांनी याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद केली.
याबाबत तपास करणारे सहायक पोलीस निरीक्षक मधुकर साळुंके म्हणाले, की जाधव किरकोळ चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. सुटका होण्यासाठी ८ ते १० दिवस राहिले होते. त्याचा शोध सुरू असून त्याच्यावर कायदेशीर रखवालीतून पळून जाण्याचा नवा गुन्हा दाखल झाला आहे. त्यात त्यास दोन वर्षांची शिक्षा होऊ शकेल. (प्रतिनिधी)

Web Title: Prisoner escapes from Yerwada Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.