‘कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी’
By admin | Published: January 24, 2017 04:42 AM2017-01-24T04:42:12+5:302017-01-24T04:42:12+5:30
राज्यातील सर्व कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्याचे गृह मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणात आढळले असल्याची माहिती
मुंबई : राज्यातील सर्व कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्याचे गृह मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणात आढळले असल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला दिली. तर राज्य सरकारने नवीन कारागृह बंधण्याकरिता आवश्यक असलेला अभ्यास करण्याकरिता उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमू, अशी माहिती उच्च न्यायालयाला दिली.
बदलत्या काळानुसार कारागृहात सुविधा उपलब्ध करण्याची आवश्यकता असल्याचे म्हणत न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने याबाबत अभ्यास करण्याची सूचना गेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारला केली होती. राज्य सरकारने नव्या कारागृहाच्या बांधणीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची तयारी दर्शवली. ‘या समितीत कारागृह महाअधीक्षक, महासंचालक, निवृत्त कारागृह महाअधीक्षक आणि टिसच्या तज्ज्ञांचा समावेश असेल,’ अशी माहितीखंडपीठाला दिली. (प्रतिनिधी)