नागपूर कारागृहातून कैदी पळाला
By admin | Published: June 16, 2015 02:58 AM2015-06-16T02:58:13+5:302015-06-16T02:58:13+5:30
मध्यवर्ती कारागृहात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत असलेला कैदी सोमवारी सकाळी पळाला. अडीच महिन्यांपूर्वीच्या ‘
नागपूर : मध्यवर्ती कारागृहात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत असलेला कैदी सोमवारी सकाळी पळाला. अडीच महिन्यांपूर्वीच्या ‘जेल ब्रेक’ची घटना ताजी असतानाच सोमवारच्या घटनेने तुरुंग प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेला पुरुषोत्तम भोयर (४५) मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी आहे. १२ वर्षांपूर्वी कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर त्याला येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. चांगली वर्तणुकीमुळे त्याला खुल्या कारागृहात ठेवले होते. वर्षभरापासून तो कारागृहाबाहेरच्या परिसरात साफसफाई करून अन्य कैद्यांकडूनही कामे करून घ्यायचा. कैद्यांवर लक्ष ठेवण्याचीही त्याच्यावर जबाबदारी होती. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो काही कैद्यांसोबत बाहेर आला. कैद्यांना आतमध्ये नेण्याची तयारी झाली. मात्र भोयर न दिसल्याने त्याची शोधाशोध करण्यात आली. (प्रतिनिधी)