अच्छेदिन गेले कुठे - पृथ्वीराज चव्हाण
By admin | Published: September 30, 2014 04:04 PM2014-09-30T16:04:54+5:302014-09-30T16:26:00+5:30
भाजपने दिलेली आश्वासने आणि दाखवलेल्या स्वप्नांवर टिका करत अच्छेदिन गेले कुठे असा प्रश्न त्यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला.
Next
>लोकमत ऑनलाइन
तुळजापूर, दि. ३० - तुळजापूर येथे काँग्रेसची पहिली जाहीर सभा झाली, या सभेत काँग्रेसनेते माणिकराव ठाकरे यांच्यासह काँग्रेसमधील इतर महत्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी पृथ्वीराज चव्हाणांनी भाजपावर टिकास्त्र सोडले. भाजपने दिलेली आश्वासने आणि दाखवलेल्या स्वप्नांवर टिका करत अच्छेदिन गेले कुठे असा प्रश्न त्यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला. आमच्याच योजनांच्या फिती पंतप्रधान मोदी कापत आहेत. तसेच मोदी परदेश दौ-यात गर्क असून परदेशी नेत्यांचा पाहूणचार करण्यात त्यांनी देशाकडे दुर्लक्ष केले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपींग भारतभेटीवर आले असतानाच चीनने लडाखमध्ये घुसखोरी केली. असे पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.
तसेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट राष्ट्रवादीमुळेच लागू झाली आहे, असाही आरोप करत फक्त मुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीने आघाडी तोडली असे ही त्यांनी म्हटले. राष्ट्रवादीचा जन्मच मुळी वैयक्तीक महत्वकांक्षेसाठी झाला आहे, असे वक्तव्य करत त्यांनी राष्ट्रवादीचे भाजपा सोबत छुपेसंधान असल्याचाही आरोप केला आहे.