खासगी प्रवासी वाहतुकदारांची 'दिवाळी लूट'

By admin | Published: October 21, 2016 09:57 PM2016-10-21T21:57:42+5:302016-10-21T21:57:42+5:30

प्रत्येक वर्षी सणासुदीत खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या भाडेवाढ करुन चांगलाच गल्ला मिळवतात. यंदा दिवाळीनिमित्त खासगी प्रवासी वाहतुकदारांकडून कोणताही विचार न करता १00 टक्के भाडे वाढविण्यात आले आहे

Private Diwali looters | खासगी प्रवासी वाहतुकदारांची 'दिवाळी लूट'

खासगी प्रवासी वाहतुकदारांची 'दिवाळी लूट'

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - प्रत्येक वर्षी सणासुदीत खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या भाडेवाढ करुन चांगलाच गल्ला मिळवतात. यंदा दिवाळीनिमित्त खासगी प्रवासी वाहतुकदारांकडून कोणताही विचार न करता १00 टक्के भाडे वाढविण्यात आले आहे. मुंबई ते नागपूर एसी स्लीपरचे भाडे हे सर्वाधिक असून ते २,५00रुपयांपर्यंत तर कोल्हापूर, जळगाव, औरंगाबादचा प्रवास १,५00 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. महत्वाची बाब म्हणजे महाबळेश्वर आणि गोवासारख्या पर्यटनस्थळी जाण्यासाठीचा प्रवासही चांगलाच महागला. हे भाडे पाहता एसटीचा प्रवास स्वस्त ठरत आहे.

खासगी वाहतुकदारांकडून भाडेवाढीची अंमलबजावणी २२ आॅक्टोबरपासून लागू केली जात आहे. भाडेवाढ २ नोव्हेंबरपर्यंत असेल. कमी गर्दीच्या काळात खासगी टॅव्हल्सना जास्त प्रवासी मिळत नाहीत. हे पाहता तिकीटांचे दर अल्प ठेवले जातात. मात्र सणासुदीत गर्दीचा काळ सुरु होताच आयती संधी साधत प्रवास भाड्यात भरमसाठ वाढ केली जाते. तीच संधी दिवाळीत साधण्यात आली आहे. प्रवासी वाहतुकदारांनी नॉन एसी बसच्या प्रवास भाड्यात ३00 रुपयांपासून ते ६00 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. एसी स्लीपरचे प्रवास भाडे हे ६00 रुपये ते १,३00 रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे.
.....
खासगी बसचे भाडे

मार्ग कमी गर्दीतील भाडे दिवाळीतील भाडे (गर्दीचा काळ)
मुंबई ते नागपूर एसी स्लीपर बस १,२00 ते १,५00 रुपये २,५00 रुपये
मुंबई ते औरंगाबाद,सातारा एसी स्लीपर बस ६00 रुपये १,३00 ते १,५00 रुपये
मुंबई ते कोल्हापूर, जळगाव, सांगली, एसी स्लीपर ६00 ते ७00 रुपये १,३00 ते १,५00 रुपये
मुंबई ते औरंगाबाद एसी स्लीपर ६00 रुपये १,३00 रुपये
मुंबई ते महाबळेश्वर एसी स्लीपर ६00 ते ६५0 रुपये १,२00 ते १,३00 रुपये
मुंबई ते गोवा एसी स्लीपर ८00 रुपये १,५00 रुपये
मुंबई ते कोल्हापूर, जळगाव, सांगली नॉन एसी सीटर ३00 ते ४00 रुपये ८00 ते ९00 रुपये
मुंबई ते महाबळेश्वर नॉन एसी सीटर ५00 रुपये ८00 रुपये
मुंबई ते औरंगाबाद नॉन एसी सीटर ३00 रुपये ६00 ते ७00 रुपये
मुंबई ते नागपूर नॉन एसी बस ६00 ते ६५0 रुपये १,000 रुपये

...........................
महाबळेश्वरला व्होल्वोला जाताना आता प्रवाशांना एक हजार रुपये ते १,१00 रुपये मोजावे लागतील. तर कमी गर्दीच्या काळात याच मार्गावर प्रवास करताना फक्त ५00 रुपये मोजावे लागतात.
..........................

तरीही एसटीचा प्रवास स्वस्त
सणासुदीत किंवा उत्सवात खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून भाडेवाढ करून चांगलीच कमाई केली जाते. ही बाब हेरून मागील वर्षापासून दिवाळीत हंगामी भाडेवाढ एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे. साध्या व रातराणीसाठी १0 टक्के, निमआरामसाठी १५ टक्के आणि शिवनेरी एसी सेवांसाठी २0 टक्के भाडेवाढ लागू केली आहे. मात्र ही भाडेवाढ करुनही एसटीचा प्रवास् स्वस्तच ठरत आहे. (प्रवास भाडे रुपयांत)
मार्ग साधी रातराणी निमआराम शिवनेरी
मुंबई ते कोल्हापूर ४५९ ५१0 ६५३ १,३00
मुंबई ते सातारा ३१३ ३६९ ४४८ --
मुंबई ते नाशिक २२२ २६२ ३१७ --
मुंबई ते जळगाव - ५९९ --- --
मुंबई ते औरंगाबाद -- ५२५ ६३४ १,३११
मुंबई ते सांगली ४६६ ५५१ ६६३ --

Web Title: Private Diwali looters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.