खासगी स्कूल बसची चिमुरडीला धडक
By admin | Published: July 22, 2016 01:20 AM2016-07-22T01:20:46+5:302016-07-22T01:20:46+5:30
आईबरोबर शाळेत जाणाऱ्या पाच वर्षीय चिमुरडीला खासगी स्कूल बसने धडक दिल्याने अपघात झाला.
बारामती : आईबरोबर शाळेत जाणाऱ्या पाच वर्षीय चिमुरडीला खासगी स्कूल बसने धडक दिल्याने अपघात झाला. यामध्ये विद्यार्थिनीचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. बारामती तालुक्यातील बांदलवाडी येथे हा अपघात घडला. रात्री उशिरापर्यंत अपघातप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सई विलास बांदल (वय ५, रा. बांदलवाडी) असे या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. गुरुवारी (दि. २१) सकाळी सई येथील शाळेत आई सोनाली बांदल यांच्यासमवेत निघाली होती. या वेळी अचानक पाठीमागून आलेल्या खासगी स्कूल बसने (एमएच ४२ बी १३६) सईला धडक दिली. यामध्ये सईचे दोन्ही पाय फ्रॅ क्चर झाले आहेत. तिच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. तिला उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे. या अपघातप्रकरणी खासगी स्कूल बसचालक एकनाथ येडबा ननवरे याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
(प्रतिनिधी)