राज्यात खासगी वाहतूक सेवा सुसाट

By admin | Published: June 12, 2017 03:07 AM2017-06-12T03:07:13+5:302017-06-12T03:07:13+5:30

खासगी सेवा पुरवणाऱ्या वाहनांना राज्यात ‘अच्छे दिन’ आले आहेत. यंदाच्या वर्षी खासगी सेवा पुरवणाऱ्या वाहनांच्या नोंदणीत तब्बल २८८.९४ टक्के वाढ झाली आहे.

Private Transportation Service in the State | राज्यात खासगी वाहतूक सेवा सुसाट

राज्यात खासगी वाहतूक सेवा सुसाट

Next

महेश चेमटे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खासगी सेवा पुरवणाऱ्या वाहनांना राज्यात ‘अच्छे दिन’ आले आहेत. यंदाच्या वर्षी खासगी सेवा पुरवणाऱ्या वाहनांच्या नोंदणीत तब्बल २८८.९४ टक्के वाढ झाली आहे. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत खासगी वाहतूक सेवा पुरवणाऱ्या ११४८ वाहनांची नोंदणी करण्यात आली. गेल्या वर्षी याच कालावधीत अवघ्या ३४९ वाहनांची नोंदणी झाली होती. राज्यात सर्व प्रकारच्या वाहनातील एकूण नोंदणीत २.३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आरटीओ कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
वातानुकूलित सेवा पुरवणाऱ्या खासगी वाहनांकडे प्रवाशांचा ओढा वाढत आहे. शिवाय, स्वमालकीच्या वाहनांसाठी पार्किंगचा प्रश्न भेडसावत असल्याने ‘खासगी सेवा पुरवणारी वाहने’ प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहेत.
राज्यभरातील एकूण वाहन नोंदणीतही २.३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा २३ लाख ५६ हजार ९८१ वाहनांची नोंदणी झाली. गेल्यावर्षी २३ लाख ३ हजार ७८३ वाहनांची नोंदणी करण्यात आली होती. राज्यात सर्वात कमी वाहन नोंदणी ही मोपेड प्रकारात येणाऱ्या दुचाकीची झाली आहे. या प्रकारात यंदा केवळ १८ हजार ४७२ वाहनांची नोंदणी झाली असून, गतवर्षी ३२ हजार ७७४ मोपेडची नोंदणी होती. यंदा दुचाकी नोंदणीत अवघ्या ०.४३ टक्यांनी वाढ झाली आहे. यंदा १७ लाख ४६ हजार ५५१ दुचाकींची नोंदणी झाली आहे. गतवर्षी १७ लाख ३९ हजार ६५ दुचाकींची नोंदणी झाली होती.

मुंबईकरांची दुचाकीला पसंती
मुंबईकरांचा दुचाकीकडे असलेला ओढा कायम असल्याचे मोटार वाहन विभागाच्या आकडेवाडीवरून दिसून येते. मुंबईच्या चार आरटीओ केंद्रात एकूण १ लाख ४३ हजार ६७८ वाहनांची नोंदणी झालेली आहे. गेल्यावर्षी १ लाख ४० हजार ५३२ इतक्या दुचाकींची नोंदणी झाली होती.

रुग्णवाहिकेची ‘शंभरी’
रुग्णवाहिकेच्या नोंदणीनेही यंदा शंभरी ओलांडली आहे. मुंबई (मध्य)- ५१, मुंबई (पश्चिम )- २५, मुंबई (पूर्व)- २४, बोरीवली -१० अशा एकूण ११० नवीन रुग्णवाहिकांची नोंद शहरातील आरटीओमध्ये करण्यात आली आहे.

Web Title: Private Transportation Service in the State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.