खासगीकरणातून होणार विकास

By Admin | Published: February 17, 2016 03:27 AM2016-02-17T03:27:51+5:302016-02-17T03:27:51+5:30

मालमत्ताकरात समाविष्ट असलेल्या सामान्यकरात १० टक्यांची वाढ करत आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे महापालिकेचे २०१५-१६ चे २२५९.२८ कोटींचे सुधारीत आणि २०१६-१७ चे २५४९.८२ कोटींचे मूळ अंदाजपत्रक

Privatization will develop | खासगीकरणातून होणार विकास

खासगीकरणातून होणार विकास

googlenewsNext

ठाणे : मालमत्ताकरात समाविष्ट असलेल्या सामान्यकरात १० टक्यांची वाढ करत आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे महापालिकेचे २०१५-१६ चे २२५९.२८ कोटींचे सुधारीत आणि २०१६-१७ चे २५४९.८२ कोटींचे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. यामध्ये आरभींची शिल्लक २३०.१० कोटींची आहे. यात विविध नवे प्रकल्प प्रस्तावित करून शहराचा विकास करतांना आणि नवे प्रकल्प उभारतांना पीपीपी, सामाजिक दायित्व, खाजगी लोकसहभाग आणि कन्स्ट्रक्शन्स टीडीआरचा आधार घेतला आहे.
मागील वर्षी मालमत्ताकरात समाविष्ट असलेल्या जललाभ कर, मलनिसारण कर, पाणीपट्टी आदींमध्ये वाढ केली होती. यंदा सलग दुसऱ्या वर्षी ठाणेकरांवर करवाढीची कुऱ्हाड कोसळली आहे. मालमत्ताकरात समाविष्ट असलेल्या सामान्यकरात १० टक्के वाढ प्रस्तावित केली असून ती निवासी आणि बिगरनिवासी मालमत्ताधारकांना लागू असणार आहे. आयुक्तांनी सादर केलेल्या या अंदाजपत्रकात महापालिकेचे उत्पन्न २०८६ कोटी, अनुदाने १७९.८६ कोटी, कर्ज ५३.८६ कोटी, आरंभीची शिल्लक २३०.१० कोटी असे अपेक्षित धरले आहे. तर महसुली खर्च १२५१.१८ कोटी, भांडवली खर्च १००१.२८ कोटी भांडवली खर्च २९७.२१ कोटी आणि अखेरची शिल्लक १५ लाख असा एकूण खर्च अपेक्षित धरला आहे. या अंदाजपत्रकातील ठळक योजनांमध्ये रस्त्यांचे रुंदीकरण व नुतनीकरणासाठी १२५ कोटी, नवीन मॉडेल रस्ते ५० कोटी, युटीडब्ल्युटी रस्ते व काँक्रीटीकरण ५०, विकास आराखड्यातील रस्ते बांधकाम ४०, मिसिंग लिंक जोडणी २५, स्मार्ट सिटी ५०, कळवा खाडीवर पूल ४०, पाणीपुरवठा वितरण व्यवस्था २०, अग्निशमन दलासाठी वाहन खरेदी २०, विकेंद्रीत पद्धतीने घनकचरा प्रक्रिया प्रकल्प १२, अत्याधुनिक साफसफाई मशिन म्हणजेच रोबोटीक मशिन १२ कोटी, मलनिसारण जेटींग वाहन खरेदी १० कोटी, इनलॅन्ड वॉटर वे (जेटीसह) १० कोटी, शाळांना व मैदांनाना संरक्षक भिंती ५ कोटी, वर्तकनगर येथे मिनी मॉल ५, पोखरण लेक लघु उद्योग परिसर विकास ५, स्मार्ट सिटी सर्व्हिलन्स प्रकल्प ५, डिजीटल मेसेजिंग सिस्टीम ५, यांत्रिक पद्धतीने कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्पासाठी ३ कोटी, शाळांमध्ये सौर ऊर्जेवर विद्युतीकरणासाठी २.५० कोटी, उपवन तलाव सुशोभिकरण व व्हर्च्युअल क्लासरुम १.५० कोटी अशा प्रकारे तरतूद प्रस्तावित केली आहे.सॉफ्ट मोबीलीटी नेटवर्क विकास, ठाणे घोडबंदर रस्त्यावर पाच ठिकाणी पादचारी पुल बांधणे, वर्तक नगर येथे मिनी मॉल, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक, बाळकुम येथे आॅल्मपीक धर्तीवरचे स्विमींग पुल, एकात्मिक तलाव सौंदर्यीकरण, सुविधा आणि आरक्षण भुखंडाचा विकास, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, आरोग्याच्या सुविधा, सेंट्रल पार्क, कम्युनिटी पार्क, हिरानंदांनी इस्टेट येथे साउर्थन पार्क, नॉर्थन पार्क, फाऊंटन पार्क, जेष्ठांचे नंदनवन उभारणे, मेडीटेशन व होलीस्टीक सेंटर, पोलीस ठाणे बांधणे, प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाकरीता योजना, एम गर्व्हरनचा घेतला जाणार आधार घेत महापालिकेच्या सर्व सोई सुविधा मोबाइलवर उपलब्ध करुन देणे, शिक्षण विभागासाठी देखील भरीव तरतुद करण्यात येऊन विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. याशिवाय कन्स्ट्रक्शन टीडीआर, पीपीपी, सामाजिक दायित्व आणि खाजगी लोकसहभागातून अनेक महत्वांकाक्षी प्रकल्प हाती घेण्याचे प्रस्तावित करुन त्यातूनही उत्पन्न कसे मिळेल याचा विचार केला गेला असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

Web Title: Privatization will develop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.