मनसेच्या प्रिया गदादे विजयी
By Admin | Published: June 30, 2014 11:57 PM2014-06-30T23:57:49+5:302014-06-30T23:57:49+5:30
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ‘56 ब’ च्या पोटनिवडणुकीत मनसेच्या उमेदवार प्रिया गदादे (मेढे) यांनी 2क्12 च्या निवडणुकीची पुनरावृत्ती करीत पुन्हा बाजी मारली.
>पुणो : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ‘56 ब’ च्या पोटनिवडणुकीत मनसेच्या उमेदवार प्रिया गदादे (मेढे) यांनी 2क्12 च्या निवडणुकीची पुनरावृत्ती करीत पुन्हा बाजी मारली. गदादे यांनी महायुतीच्या उमेदवार वैशाली दारवटकर यांचा तब्बल 8 हजार 53 मतांनी पराभव केला. गदादे यांना 1क् हजार 797 मते मिळाली, तर शिवसेनेच्या वैशाली दारवटकर यांना 2 हजार 744 मते मिळाली. या निवडणुकीसाठी 47. 69 टक्के मतदान झाले होते. त्यात 15 हजार 3क्7 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता.
बनावट जन्म दाखल्याप्रकरणी मार्च 2क्12 च्या महापालिका निवडणुकीत प्रिया गदादे यांचे नगरसेवकपद सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविले होते. त्यामुळे या जागेवर पुन्हा पोटनिवडणूक घेण्यात आली. मनसेने पुन्हा उमेदवारी दिलेल्या प्रिया गदादे शिवसेनकडून वैशाली दारवटकर, काँग्रेसकडून अनिता वाळुंजकर, भारिप बहुजन महासंघाकडून सरस्वती गायकवाड, तर अपक्ष उमेदवार म्हणून वनिता देशमुख अशा पाच उमेदवारांमध्ये ही लढत होणार होती.
रविवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सकाळी गणोश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडली. सात फे:यांमध्ये झालेल्या या मतमोजणीत गदादे यांना सर्वाधिक 1क् हजार
797 मते मिळाली. या निर्णयानंतर शहर मनसेच्या वतीने जनता
वसाहत परिसरात विजयी रॅलीचे आयोजन केले होते. (प्रतिनिधी)