पतीची हत्या करणाऱ्या पत्नीसह प्रियकरास जन्मठेप
By admin | Published: June 18, 2017 12:38 AM2017-06-18T00:38:59+5:302017-06-18T00:38:59+5:30
गंजबाजारातील मोहन ट्रंक डेपोचे मालक जितेंद्र मोहनलाल भाटिया खूनप्रकरणी जिल्हा न्यायालयाने जितेंद्र यांची पत्नी हेमा आणि तिचा प्रियकर प्रदीप उर्फ शप्पू जनार्दन
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : गंजबाजारातील मोहन ट्रंक डेपोचे मालक जितेंद्र मोहनलाल भाटिया खूनप्रकरणी जिल्हा न्यायालयाने जितेंद्र यांची पत्नी हेमा आणि तिचा प्रियकर प्रदीप उर्फ शप्पू जनार्दन कोकाटे याला दोषी ठरवून जन्मठेप, तर हत्याकांडासाठी पिस्तूल विकणाऱ्या विक्रम उर्फ गोट्या किशोर बेरड यास चार वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली़जिल्हा न्यायाधीश एस़ व्ही़ माने यांनी शनिवारी हा निकाल दिला़
भाटिया यांचा २७ एप्रिल २०१४ रोजी त्यांच्याच दुकानात प्रदीप कोकाटे याने गोळ्या घालून खून केला होता़ जितेंद्र यांची पत्नी हेमा उर्फ दिव्या भाटिया हिने प्रियकर प्रदीप यास हाताशी धरून हे हत्याकांड घडविल्याचे पोलीस तपासात समोर आले होते़ चौकशीतून जितेंद्र यांची पत्नी हेमा हत्याकांडाची मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले़
फिर्यादी पक्षातर्फे खटल्यात एकूण ४१ साक्षीदार तपासण्यात आले होते़
आरोपी प्रदीप हा कॉम्प्युटर रिपेअरिंगचे काम करत होता़ त्याची हेमाशी ओळख झाली़ ओळखीचे रूपांतर पे्रमात झाले़ हेमा आणि जितेंद्र यांचे सतत भांडण व्हायचे. प्रदीप आणि हेमा यांच्यातील प्रेमसंबंधांबाबत जितेंद्र यांना माहीत झाले होते़
दोघांच्या पे्रमात अडसर ठरणाऱ्या पतीला संपविण्याचा निर्णय हेमाने घेतला़ हेमाने प्रदीपला पिस्तूल घेण्यासाठी पैसे दिले होते.