प्रियंकालाही मदतीचा ओघ सुरू
By Admin | Published: August 21, 2016 09:42 PM2016-08-21T21:42:43+5:302016-08-21T21:42:43+5:30
आई-वडिलांच्या मृत्यूनंतर पोरकी झालेल्या तेर येथील प्रियंका शिंदे या सहावीत शिकणाऱ्या मुलीचा तिची ७० वर्षीय आजी संभाळ करीत आहे़
सुमेध वाघमारे/ऑनलाइन लोकमत
तेर, दि. 21 - आई-वडिलांच्या मृत्यूनंतर पोरकी झालेल्या तेर येथील प्रियंका शिंदे या सहावीत शिकणाऱ्या मुलीचा तिची ७० वर्षीय आजी संभाळ करीत आहे़ याबाबत ‘लोकमत’ने रविवारी ‘७० वर्षाची आजी करते नातीचा सांभाळ!’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते़ या वृत्ताची दखल घेत आ़ राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रियंकाच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतचे पालकत्व स्विकारले आहे़ तर ग्रामस्थांनीही आपापल्या परीने प्रियंका व तिच्या आजीला मदतीचा हात दिला आहे़
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील कांताबाई बळीराम कदम (वय ७०) यांची मुलगी मैना राजकुमार शिंदे यांचा मृत्यू तीन वर्षापूर्वी झाला आहे़ तर मैना शिंदे यांचे पती राजकुमार सत्यभान शिंदे यांचा बारा वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. पतीच्या मृत्यूनंतर मैना शिंदे या आपली मुलगी प्रियंकासह तेर येथे वास्तव्यास आल्या होत्या. मुलगी प्रियंका हीस लातूर येथे विवेकानंद प्राथमिक विद्यालयात शिक्षणासाठी ठेवून मैना शिंदे व तिची आई कांताबाई कदम यांच्यासह मोलमजुरीला जावून कुटुंबाचा उदरनिर्वाह व मुलीच्या शिक्षणाचा खर्च भागवत होत्या. मैना शिंदे यांचा मृत्यू झाल्यानंतर कांताबाई कदम यांनी प्रियंकाला लातूर येथील शाळेतून काढून तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत शिक्षणासाठी दाखल केले. प्रियंका ही सध्या सहावीत शिक्षण घेत आहे. ७० वर्षीय कांताबाई कदम या मजुरी करुन नातीचा शिक्षणाचा खर्च भागवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात़ गावातील काही नागरिकांनी एकत्र येवून प्रियंकास शालेय साहित्य व जीवनावश्यक वस्तूची केली होती़ प्रियंकाच्या वृध्द आजीचे नातीसाठी सुरू असलेले प्रयत्नांचे वृत्त ‘लोकमत’ने रविवारी प्रसिध्द केले होते़ या वृत्ताची दखल घेवून आ़ राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रियंकाच्या शिक्षणासह लग्नापर्यंत तिचे पालकत्व स्विकारले आहे़ तर गावातील बालाजी बनकर, प्रविण साळुंके हे प्रियंकाला शाळेत येण्या-जाण्यासाठी सायकल घेवून देणार असून, दहावीपर्यंत शैक्षणिक साहित्याची मदत करणार आहेत़ तर गोरोबा पाडुळे यांनी एक हजाराची मदत प्रियंकाला केली आहे़ तेर येथील बीट अंमलदार श्रीशैल्य कट्टे यांनीही प्रियंकाच्या शिक्षणासाठी महिनाकाठी ५०० रूपयांची मदत देण्याचा संकल्प केला आहे़
निकितापाठोपाठ प्रियंकालाही मदतीचा हात
‘लोकमत’ने उस्मानाबाद तालुक्यातील गोवर्धन वाडी येथील संघर्षशील निकिताची कहानी मांडली होती़ ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेवून सबंध राज्यातून निकिताला मदतीचा हात मिळाला़ तेर येथील प्रियंका शिंदे हिच्या शिक्षणासाठी तिच्या आजी कांताबाई कदम यांचे सुरू असलेले प्रयत्न ‘लोकमत’ने वृत्तातून मांडले होते़ याची दखल घेवून प्रियंकाला व तिच्या आजीला मदतीचा हात मिळाला आहे़
निकिताला मिळाले रेशन कार्ड
उस्मानाबाद तालुक्यातील गोवर्धन वाडी येथील संघर्षशील निकिताची कहानी ‘लोकमत’ने मांडल्यानंतर राज्याच्या विविध भागातून तिला मदतीचा ओघ सुरू झाला आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनीही या बहिणींची भेट घेऊन त्यांना रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याच्या सूचना तहसीलदारांना केल्या होत्या. त्यानुसार रविवारी प्रशासनाच्या वतीने निकिताच्या नावे रेशन कार्ड देण्यात आले आहे. यावेळी सरपंच विनोद थोडसरे, तलाठी एस. के. तांबारे, बालाजी लोमटे, बाळासाहेब थोडसरे आदी उपस्थित होते. या कार्डमध्ये निकिता व तिच्या लहान बहिणीचे नाव समाविष्ट असून, या कार्डाद्वारे त्यांना दरमहा चार युनिटचे एकूण ३५ किलो धान्य