प्रियंकाच्या मृतदेहाचे शीर व पाय सापडले

By admin | Published: May 15, 2017 06:29 AM2017-05-15T06:29:20+5:302017-05-15T06:29:20+5:30

लग्नाला भाग पाडल्याने पतीने हत्या केलेल्या वरळीतील प्रियंका गुरवच्या मृतदेहाचे इतरही भाग पोलिसांना सापडले आहेत.

Priyanka's body found the head and legs | प्रियंकाच्या मृतदेहाचे शीर व पाय सापडले

प्रियंकाच्या मृतदेहाचे शीर व पाय सापडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : लग्नाला भाग पाडल्याने पतीने हत्या केलेल्या वरळीतील प्रियंका गुरवच्या मृतदेहाचे इतरही भाग पोलिसांना सापडले आहेत. यामध्ये इतर एकाचा सहभाग समोर आला असून त्यालाही रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी रबाळे एमआयडीसी हद्दीत धड टाकल्यानंतर शीर शहापूरच्या जंगलात तर पाय अंबरनाथ मार्गावर टाकले होते.
वरळीच्या सर पोचखानवाला रोड येथील स्लिपर चाळीत राहणाऱ्या सिध्देश गुरव याने लग्नासाठी तगादा लावल्याने प्रियंकाशी लग्न करून पाचव्या दिवशीच तिची हत्या केली होती. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी टाकले होते. त्यापैकी धड रबाळे एमआयडीसीमध्ये आढळून आल्यानंतर मानेवरील टॅटूमुळे तिची ओळख पटली व हत्येचा उलगडा झाला. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी रात्री पती सिध्देश, सासरे मनोहर व सासू माधुरी यांच्यासह त्यांना मदत करणारा दुर्गेश पटवा यांना अटक केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत मृतदेहाचे इतर तुकडे टाकलेल्या ठिकाणाची माहिती दिली.
यानुसार पोलिसांनी दोन दिवसांत तिचे शीर व पाय शोधून काढले आहेत. प्रियंकाची सासरच्यांनी हत्या केल्यानंतर मृतदेह बाथरुममध्ये ठेवला होता. त्याठिकाणी पटवा याने मृतदेहाचे तुकडे करून त्याची वेगवेगळ्या ठिकाणी विल्हेवाट लावली होती. याकरिता त्याने एक लाखाची सुपारी घेतल्याचे समोर आले आहे. याकामी पटवा याने त्याच्या एका मित्राची मदत घेतल्याचे उघड होताच त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. मित्राच्या कारमधून मृतदेहाचे तुकडे तीन ठिकाणी टाकले होते. यावेळी मृतदेहाची ओळख पटू नये याकरिता त्यांनी शहापूरलगतच्या जंगलामध्ये तिचे शीर व अंबरनाथ मार्गावर पाय जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

Web Title: Priyanka's body found the head and legs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.