प्रियकराचा आत्महत्येचा ‘ड्रामा’

By Admin | Published: March 23, 2017 01:53 AM2017-03-23T01:53:50+5:302017-03-23T01:53:50+5:30

क्षुल्लक वादातून प्रेयसीने आत्महत्या केली, ही बाब प्रियकराला समजताच, त्यानेही आत्महत्येसाठी १२व्या मजल्यावरून उडी

Priyanka's suicide 'Drama' | प्रियकराचा आत्महत्येचा ‘ड्रामा’

प्रियकराचा आत्महत्येचा ‘ड्रामा’

googlenewsNext

मुंबई : क्षुल्लक वादातून प्रेयसीने आत्महत्या केली, ही बाब प्रियकराला समजताच, त्यानेही आत्महत्येसाठी १२व्या मजल्यावरून उडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न फसल्याने तो घाबरला. ग्रीलला लटकलेल्या तरुणाला पाहून सर्वांच्याच नजरा त्याच्यावर खिळल्या. स्थानिकांसह कुटुंब, पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी त्याची समजूत काढत होते. तो थांबावा, म्हणून त्याच्यावर भावनिक दबाव आणत थांबण्याचा सल्ला देत होते. तासभर सुरू असलेल्या फिल्मी ड्रामानंतर, अखेर पोलिसांनी शिताफीने त्याला आत ओढून त्याचे प्राण वाचविल्याची घटना दादरमध्ये घडली. या घटनेदरम्यान खाली नागरिकांची एकच गर्दी जमा झाली होती.
दादरमधील अमेया कोआॅपरेटिव्ह सोसायटी येथील इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून एका १७ वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती दादर पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मूळची चिपळूणची रहिवासी असलेल्या तरूणीने आत्महत्या केल्याचे समोर आले. ती डोमेस्टिक हेल्पमध्ये काम करत होती. या घटनेने खळबळ उडाली. या घटनेचा पंचनामा सुरू असतानाच, त्याच इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून एक तरुण ग्रीलला लटकलेला दिसून आला. इमारतीखाली जमलेल्या गर्दीच्या नजरा त्याच्याकडे खिळल्या. त्याला वाचविण्यासाठी तपास पथकाने तरुणाच्या घराकडे धाव घेतली. गणेश खीर (३९) असे त्याचे नाव असून, तो पत्नी आणि मुलासोबत तेथे राहातो. त्याचे तरूणीसोबत प्रेमसंबंध होते. तिने आत्महत्या केल्याचे समजताच, त्याने फिनेल पिऊन आत्महत्येसाठी खिडकीच्या ग्रीलमधून खाली उडी घेतली. मात्र, त्याच दरम्यान त्याचा पाय घसरल्याने खाली पाहून तो घाबरला. त्याने ग्रीलला घट्ट धरून ठेवले होते. इथे पत्नीसह पोलिसांनी त्याची समजूत काढण्यास सुरुवात केली. (प्रतिनिधी)

Web Title: Priyanka's suicide 'Drama'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.