१० हजारांच्या पीककर्जासाठी अडचणींचा डोंगर!

By admin | Published: June 18, 2017 12:51 AM2017-06-18T00:51:49+5:302017-06-18T00:51:49+5:30

कर्जमाफीपूर्वी थकीत कर्जदारांना खरीप हंगामाच्या तयारीसाठी १० हजार रुपये तातडीचे पीककर्ज देण्यासंदर्भात शासनाचे निकष शेतकऱ्यांना अडचणीचे असल्याची स्थिती

The problem of 10 thousand peak crops! | १० हजारांच्या पीककर्जासाठी अडचणींचा डोंगर!

१० हजारांच्या पीककर्जासाठी अडचणींचा डोंगर!

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कर्जमाफीपूर्वी थकीत कर्जदारांना खरीप हंगामाच्या तयारीसाठी १० हजार रुपये तातडीचे पीककर्ज देण्यासंदर्भात शासनाचे निकष शेतकऱ्यांना अडचणीचे असल्याची स्थिती आहे. त्यात नोटाबंदीच्या संकटानंतर जिल्हा बँकांकडे खेळते भांडवलच नसल्याने त्यांनी हात वर केले आहे. त्यामुळे शासनाचा हा निर्णय केवळ घोषणा ठरण्याची भीती आहे.
विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश शेतकरी निकष पूर्ण करतील मात्र नोटाबंदीनंतर जिल्हा बँका अचडणीत आल्या आहेत. जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा अजून बदलून देण्यात न आल्याने या बँकांकडे खेळते भांडवलच शिल्लक नाहीत. तसेच नाशिक, धुळेसह १६ जिल्हा बँकांमध्ये पैसेच नाहीत.
शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी निकषांत बदल करण्याची मागणी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने केली आहे.

राज्य बँकेची मदतीची भूमिका...
शेतकऱ्यांना तातडीचे कर्ज देण्यासाठी अडचणीत असलेल्या जिल्हा बँकांना राज्य सहकारी बँक मदत करेल. आम्ही जिल्हा बँकांना पतपुरवठा करत असतो. शेतकऱ्यांसाठी बँकांना तात्पुरती मदत करण्यास आम्ही तयार आहोत. यासंदर्भात लवकरच बैठक घेतली जाईल. शेतकऱ्यांना अचडणीत येऊ देणार नाही.
- डॉ. एम. एल. सुखदेवे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक

Web Title: The problem of 10 thousand peak crops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.