जेईई अॅडव्हान्स परीक्षेतील भौतिकशास्त्राचे प्रश्न कठीण
By Admin | Published: May 25, 2015 03:56 AM2015-05-25T03:56:40+5:302015-05-25T03:56:40+5:30
देशभरातील आयआयटी आणि तत्सम संस्थेच्या प्रवेशासाठी रविवारी घेण्यात आलेल्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा पेपर विद्यार्थ्यांना कठीण गेला.
मुंबई : देशभरातील आयआयटी आणि तत्सम संस्थेच्या प्रवेशासाठी रविवारी घेण्यात आलेल्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा पेपर विद्यार्थ्यांना कठीण गेला. मुंबईसह देशभरात ही परीक्षा पार पडली. पेपर १ आणि पेपर २ अशी स्वरूपात ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला सुमारे १ लाख २ हजार विद्यार्थी बसले होते. अॅडव्हान्स परीक्षेत भौतिकशास्त्राचे (फिजिक्स) प्रश्न कठीण असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. तर काहींनी मॅथ्सचा पेपरच्या सेक्शन दोनचा काही भाग कठीण असल्याची तक्रार केली आहे. अनेकांनी पेपर गेल्या वर्षीच्या तुलनेत अवघड तर लेन्दी असल्याची तक्रार केली आहे. यासंदर्भात आयआयटी मुंबईकडे कोणत्याही प्रकारची तक्रार आली नसल्याचे आयआयटी मुंबईने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)