‘झिका’ आजाराचा सामना शक्य - आरोग्यमंत्री

By admin | Published: May 30, 2017 04:05 AM2017-05-30T04:05:31+5:302017-05-30T04:05:31+5:30

‘झिका’ आजाराचा विषाणू भारतात आढळून आला असला, तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह

Problem of 'Zika' disease possible - Health Minister | ‘झिका’ आजाराचा सामना शक्य - आरोग्यमंत्री

‘झिका’ आजाराचा सामना शक्य - आरोग्यमंत्री

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘झिका’ आजाराचा विषाणू भारतात आढळून आला असला, तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह झिका आजाराचा धोका टाळता येऊ शकतो. आरोग्य विभागाने त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.
या आजारासंबंधी आरोग्यमंत्री म्हणाले की, ‘झिका आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंग्यू आजारासारखी असतात. त्यामध्ये ताप, अंगावर पुरळ उमटणे, डोळे येणे, सांधे व स्नायुदुखी, थकवा, डोकेदुखी यांचा समावेश होतो. ही लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य स्वरूपाची असतात आणि ती दोन ते सात दिवसांपर्यंत राहतात. यावर कोणतेही विशिष्ट औषध अथवा लस उपलब्ध नाही.’
आरोग्यमंत्री म्हणाले की, ‘राष्ट्रीय रोगनिदान संस्था, नवी दिल्ली आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे येथे झिका आजाराच्या निदानाची सुविधा मोफत उपलब्ध आहे. संशयितांनी तत्काळ या ठिकाणच्या रोगनिदान केंद्रांशी संपर्क साधून उपचार घ्यावेत. योग्य प्रतिबंध हाच उपाय असल्याने संशयित रुग्णांनी खबरदारी घ्यावी,’ असेही ते पुढे म्हणाले.

डास निर्मूलन गरजेचे
रुग्णांनी पुरेशी विश्रांती घ्यावी, तसेच निर्जलीकरण टाळण्यासाठी द्रव पदार्थांचे सेवन करावे. तापासाठी पॅरासिटामोलच वापरा. एस्पिरिन अथवा एनएसएआयडी सारख्या औषधांचा वापर करू नये. याचा प्रसार एडीस डासापासून होत असल्याने नागरिकांनी सोसायटी परिसरात डास निर्मूलनाची मोहीम हाती घ्यावी. ‘झिका’ हा आजार कीटकजन्य आहे. त्याचा प्रसार हवेमार्फत होत नाही, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: Problem of 'Zika' disease possible - Health Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.