अंबाबाई मूर्तीवर आजपासून संवर्धन प्रक्रिया
By admin | Published: July 25, 2015 01:24 AM2015-07-25T01:24:49+5:302015-07-25T01:24:49+5:30
करवीरनिवासिनी अंबाबाई मूर्तीवर करण्यात येणाऱ्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेला झालेल्या विरोधामुळे गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरात
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मूर्तीवर करण्यात येणाऱ्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेला झालेल्या विरोधामुळे गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरात निर्माण झालेला तणाव शुक्रवारी निवळला. शनिवारपासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी पत्रकार परिषदेत दिली. रासायनिक संवर्धन प्रक्रियेअंतर्गत २२ जुलैला धार्मिक विधी सुरू झाले. मात्र हिंदू जनजागृती समितीच्या विरोधामुळे कोल्हापुरात येणार नसल्याची भूमिका पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी घेतली होती. त्यानंतर शुक्रवारी सैनी यांनी देवस्थान समिती, करवीरनिवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळ, हिंदू जनजागृती समितीची संयुक्त बैठक घेतली. प्रक्रियेसाठीचा निधी औरंगाबादला वर्ग झाला असून, तेथून ‘पुरातत्त्व’चे अधिकारी व तज्ज्ञांचे पथक कोल्हापूरसाठी रवाना झाले.