'महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ'

By admin | Published: September 24, 2016 01:49 AM2016-09-24T01:49:10+5:302016-09-24T01:49:10+5:30

महाराष्ट्रातील पात्र महाविद्यलयांना स्वायत्तता देण्याच्या प्रक्रियेमध्ये अधिक सुलभता आणण्यात येईल.

'The process of giving autonomy to colleges is more accessible' | 'महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ'

'महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ'

Next


मुंबई : महाराष्ट्रातील पात्र महाविद्यलयांना स्वायत्तता देण्याच्या प्रक्रियेमध्ये अधिक सुलभता आणण्यात येईल. तसेच हे धोरण अधिक सुस्पष्ट करण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान, महाराष्ट्र (रुसा) यांच्या वतीने पात्र महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याबाबतच्या चर्चासत्राचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सेंट झेविअर्स महाविद्यालयात झाले. या वेळी रुसाच्या महाराष्ट्राच्या प्रकल्प संचालक मनीषा वर्मा उपस्थित होत्या.
तावडे यांनी चर्चासत्राला उपस्थित विविध विद्यापीठांचे कुलगुरू, महाविद्यालयाचे प्राचार्य आदींची महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याबाबतची मते जाणून घेतली. स्वायत्ततेसंदर्भात उद्भवणाऱ्या अडचणी, याबाबतच्या सूचना तावडे यांनी या वेळी समजून घेतल्या. महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे, तसेच स्वायत्तता धोरणाबाबत अधिक स्पष्टता आणण्यासाठी तसेच ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने येत्या तीन महिन्यांत या विषयाचा अभ्यास करून त्यावर नक्कीच सकारात्मक तोडगा काढण्यात येईल. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्याशी यासंदर्भात चर्चा करण्यात येईल, असेही तावडे यांनी सांगितले. महाविद्यालयांच्या स्वायत्ततेबाबत आजच्या चर्चासत्रात सविस्तर चर्चा करून काही महाविद्यालयांचे ग्रुप तयार करून त्याचा दर तीन महिन्यांनी आढावा घेण्याची सूचनाही तावडे यांनी या वेळी केली. (प्रतिनिधी)

Web Title: 'The process of giving autonomy to colleges is more accessible'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.