इतिवृत्त बनविण्याची कार्यवाही थांबली!

By admin | Published: July 19, 2016 02:14 AM2016-07-19T02:14:49+5:302016-07-19T02:14:49+5:30

मानोरा नगर पंचायतमध्ये कर्मचा-यांची वानवा, जिल्हाधिका-यांकडे नगरसेवकांनी वाचला समस्यांचा पाढा.

The process of making a chronicle stopped! | इतिवृत्त बनविण्याची कार्यवाही थांबली!

इतिवृत्त बनविण्याची कार्यवाही थांबली!

Next

वाशिम : मानोरा नगर पंचायतला कायमस्वरुपी मुख्याधिकारी नसल्याने आणि कर्मचार्‍यांची वानवा असल्याने सभेचे इतवृत्त बनविण्याची कार्यवाही थांबली आहे. यासंदर्भात नगराध्यक्षांसह पदाधिकार्‍यांनी सोमवारी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन देत नगर पंचायतच्या समस्यांचा पाढा वाचला.
१७ जुलै २0१५ रोजी मानोरा ग्रामपंचायत विसजिर्त करून नगर पंचायतला मान्यता देण्यात आली. १७ जुलै २0१६ रोजी मानोरा नगर पंचायतला एक वर्षे पूर्ण झाले. मात्र, विकास कामे ठप्प आहेत. मानोरा शहरात विविध विकासात्मक कामे, नियमित स्वच्छता, पाणीपुरवठा आदी कामे सुरळीत होण्यासाठी नगर पंचायतला आवश्यक ते मनुष्यबळ आणि कायमस्वरूपी मुख्याधिकारी अद्यापही मिळाले नाही. प्रभारी मुख्याधिकारी मानोरा येथे येत नसल्याने विकासात्मक कामांना बाधा निर्माण झाली. नगर पंचायत सभेचे कामकाज करण्याकरिता सचिव म्हणून कोणीही नसल्यामुळे सभा कशा पद्धतीने घ्याव्या? असा प्रश्न नगर पंचायत अध्यक्षांसह पदाधिकार्‍यांसमोर निर्माण झाला. सभेचे इतवृत्त लिहिण्यास कोणीही नाही. बजेटची सभा झाली. परंतु आजपर्यंतही इतवृत्त बनविले नाही. शहराचा विकास करण्याकरिता ह्यडीपीआरह्ण तयार करुन त्याची मंजुरी जिल्हाधिकार्‍यांकडून घेणे आवश्यक आहे. सदर कामदेखील अद्यापपर्यंत झाले नाही. अधिकारी व कर्मचारी कायमस्वरुपी नसल्याने आणि प्रभारी कर्मचारी ही बाब गांभीर्याने घेत नसल्याने सभेचे इतवृत्त बनविण्याची कार्यवाही थांबली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी पदाधिकार्‍यांनी सोमवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे केली.

Web Title: The process of making a chronicle stopped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.