'करून गेलो गाव' टीमची सामाजिक बांधिलकी; इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी CM शिंदेंकडे सोपवला धनादेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 09:48 PM2023-08-23T21:48:33+5:302023-08-23T21:49:00+5:30
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी इथं रात्रीच्या वेळी दरड कोसळून अनेक घरं ढिगाऱ्याखाली गेली अन् अनेकांनी जीवही गमावले.
Karun Gelo Gaav : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी इथं रात्रीच्या वेळी दरड कोसळून अनेक घरं ढिगाऱ्याखाली गेली अन् अनेकांनी जीवही गमावले. इर्शाळवाडीतील ही घटना म्हणजे एक वाईट स्वप्नच. घटनेच्या तीन दिवस प्रशासनातर्फे तिथं बचावकार्य सुरू होतं. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या नागरिकांच्या परिजनांना मदतीचा हात देण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेत आर्थिक मदत केली. अशातच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी देखील मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्याकडे दोन लाख रूपयांचा धनादेश सोपवला आहे.
'करून गेलो गाव' या नाटकाचे निर्माते महेश मांजरेकर आणि राहुल भंडारे यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेऊन धनादेश दिला. याबाबत माहिती देताना शिंदे म्हणाले की, मराठी व हिंदी नाट्य, मालिका आणि चित्रपट क्षेत्रात आपला कायमस्वरूपी ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते तसेच 'करून गेलो गाव' या नाटकाचे निर्माते, अश्वमी थिएटरचे महेश मांजरेकर आणि अद्वैत थिएटरचे राहुल भंडारे यांनी आज माझ्या सदिच्छा भेट घेतली.
मराठी व हिंदी नाट्य, मालिका आणि चित्रपट क्षेत्रात आपला कायमस्वरूपी ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते तसेच 'करून गेलो गाव' या नाटकाचे निर्माते, अश्वमी थिएटरचे महेश मांजरेकर आणि अद्वैत थिएटरचे राहुल भंडारे यांनी आज माझ्या सदिच्छा भेट घेतली.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 23, 2023
या नाटकाचा अमृत… pic.twitter.com/hHNoZd9afY
तसेच या नाटकाचा अमृत महोत्सवी प्रयोगानिमित्त निर्मात्यांनी तीन प्रयोगांचे आयोजन एकाच दिवशी करून त्यातून मिळणारी रक्कम ही सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला. आज या भेटीदरम्यान त्यांनी दोन लाखाचा धनादेश माझ्याकडे सुपूर्द केला. यावेळी त्यांनी दाखवलेल्या या सहृदयतेबाबत त्यांचे कौतुक केले. तसेच हे नाटक यापुढे देखील असेच सुरू राहावे अशा शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणखी सांगितलं.