उत्पादन झाले दुप्पट; शेतकऱ्याला बियाणे पावले, महाराष्ट्रासह सहा राज्यांत मिळतेय पसंती
By मेहरून नाकाडे | Published: April 6, 2024 10:32 AM2024-04-06T10:32:53+5:302024-04-06T10:33:07+5:30
चवीला उत्तम, मध्यम बारीक दाणा, १३५ दिवसांत तयार होणाऱ्या ‘रत्नागिरी आठ’ (सुवर्णा - मसुरा) भाताची गोडी महाराष्ट्रासह अन्य सहा राज्यांनाही लागली आहे.
- मेहरून नाकाडे
रत्नागिरी - चवीला उत्तम, मध्यम बारीक दाणा, १३५ दिवसांत तयार होणाऱ्या ‘रत्नागिरी आठ’ (सुवर्णा - मसुरा) भाताची गोडी महाराष्ट्रासह अन्य सहा राज्यांनाही लागली आहे. या वाणाच्या वाढत्या मागणीमुळे डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने गतवर्षीच्या ६० टन बियाण्यापेक्षा दुप्पट बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदा १५० टन बियाणे विद्यापीठाने तयार केले आहे.
शिरगाव (ता. रत्नागिरी) येथील विद्यापीठाच्या भात संशोधन केंद्राने २०१९ साली ‘रत्नागिरी आठ’ हे वाण विकसित केले. खासगी कंपन्या विद्यापीठाच्या मान्यतेने बियाणे तयार करून विक्री करत आहेत.
वाणाची वैशिष्ट्ये
- १३५ ते १४० दिवसांत हेे भातपीक तयार होते.
-तुटीचे प्रमाण कमी, बदलत्या हवामानात टिकते
- प्रतिहेक्टर ८५ ते ९० क्विंटल उत्पन्न