हरभऱ्याचे उत्पादन भरघोस होणार ; रब्बी पेरणीने गाठली सरासरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 05:50 PM2020-02-11T17:50:16+5:302020-02-11T17:53:01+5:30
राज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ५६ लाख ९३ हजार ६५ हेक्टर
पुणे : रब्बीने सरासरी क्षेत्राचा आकडा गाठला असला तरी ज्वारी आणि तेलबियांच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. तर, हरभऱ्याच्या क्षेत्रात सरासरीच्या दीडपट वाढ झाल्याने, भरघोस उत्पादन होईल. गव्हाची देखील सरासरी क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
राज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ५६ लाख ९३ हजार ६५ हेक्टर असून, ५६ लाख १३ हजार २३५ हेक्टरवरील (९८.६० टक्के) पेरणीची कामे झाली आहेत. गेल्यावर्षी परतीच्या पावसाने पाठ फिरवली होती. तर, मराठवाडा आणि विदर्र्भ आणि मध्यमहाराष्ट्रातील काही जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. परिणामी राज्यात निम्म्या क्षेत्रावर देखील पेरणी होऊ शकली नाही. यंदा सर्वदूर चांगला पाऊस झाल्याने रब्बीने सरासरी गाठली आहे.
ज्वारीच्या क्षेत्रात सातत्याने घट नोंदविण्यात येत आहे. ज्वारीचे सरासरी क्षेत्र २६ लाख ७८ हजार ५१३ हेक्टर असून,१८ लाख ४८ हजार ७७६ हेक्टरवर (६९ टक्के) पेरणी झाली आहे. गेल्यावर्षी दुष्काळामुळे अवघ्या १२ लाख ४६ हजार ३४२ हेक्टरवर ज्वारीच्या पेरण्या होऊ शकल्या होत्या. गव्हाचे सरासरी क्षेत्र १० लाख १४ हजार ८०४ हेक्टर असून, पैकी ११ लाख १० हजार १६६ हेक्टरवर (१०९ टक्के) पेरणी झाली आहे.
हरभºयाच्या क्षेत्रात यंदा चांगली वाढ झाली आहे. हरभºयाचे सरासरी क्षेत्र १४ लाख ९० हजार २४७ हेक्टर असून, त्यात २२ लाख ५१ हजार ७ हेक्टरपर्यंत (१५१ टक्के) वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा हरभºयाचे भरगोस उत्पादन होईल. करडई, जवस, तीळ, सूर्यफूळ या तेलबियांचे सरासरी क्षेत्र १ लाख ६१ हजार ७९३ हेक्टर असून, त्या पैकी ३९ हजार ४४६ हेक्टरवर (२४ टक्के) पेरणी झाली आहे. गेली काही वर्षे ज्वारी आणि तेलबियांच्या क्षेत्रात सातत्याने घट नोंदविण्यात येत असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे.