चळवळीतून साहित्याची निर्मिती

By admin | Published: January 19, 2016 01:39 AM2016-01-19T01:39:32+5:302016-01-19T01:39:32+5:30

चळवळी याच साहित्यनिर्मितीचा आधार असतात. पण, या दोन्ही वाटा आता वेगवेगळ्या दिशेने चालल्या आहेत. सर्वांना मिळुन जातीविहीन समाज निर्माण करायचा आहे

Production of literature from the movement | चळवळीतून साहित्याची निर्मिती

चळवळीतून साहित्याची निर्मिती

Next

प्रज्ञा केळकर-सिंग, ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी)
चळवळी याच साहित्यनिर्मितीचा आधार असतात. पण, या दोन्ही वाटा आता वेगवेगळ्या दिशेने चालल्या आहेत. सर्वांना मिळुन जातीविहीन समाज निर्माण करायचा आहे. त्यामुळे दलित आणि ग्रामीण साहित्य असा भेदाभेद न करता, सर्वांनी मिळुन साहित्याची चळवळ पुढे घेऊन जाण्याची गरज आहे.
सर्वसमावेशक विकास समाजाला एकत्र आणेल आणि त्यातुन सकस साहित्यनिर्मिती होइल, असा आशावाद परिसंवादामध्ये वक्तांनी व्यक्त केला.
येथील ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये बदलते सामाजिक-राजकीय अस्तित्व आणि दलित व ग्रामीण साहित्य या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. दत्ता भगत अध्यक्षस्थानी होते.
परिसंवादात अतुल लोंढे, प्रकाश खरात, डॉ. रा.रं.बोराडे, प्रा. शेषराव मोहिते, विनय कोरे, शेखर गायकवाड आदिंनी सहभाग नोंदवला. सर्वांनी सहित्य संमेलनाच्या नियोजनाचे भरभरुन कौतुक केले. या संमेलनाने यापुढील संमेलनांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे, असेही मत या वेळी मांडण्यात आले.
खरात म्हणाले, ‘‘ नकार, विद्रोह आणि मानवता ही दलित सहित्याची त्रिसुत्री आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजात अभुतपुर्व जाग्रुती केली. मात्र, आता जीवनचे संदर्भ बदलले आहेत. दलित साहित्याच्या संकल्पनेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मोहिते म्हणाले, ‘‘ अर्थकारण हा सामाजिक आणि राजकीय बदलाचा पाया आहे. सकारात्मक राजकीय परिवर्तनाचा लाभ केवळ शहरी भागाला झाला. ग्रामीण भागाला मात्र जाणीवपुर्वक वंचित ठेवण्यात आले आहे. शेतक- यांच्या आत्महत्याकडे अत्यंत असंवेदनशीलतेने पाहिले जाते. हे सर्व चित्र ग्रामीण साहित्यामध्ये पहायला मिळते.
आजकाल दलित साहित्यिक स्वतला दलित म्हणवून घेत नाहीत. दुसरीकडे या साहित्यिकांना एका चौकटीत बसवण्याचे, त्यांची अवहेलना करण्याचे काम समाजाकडुन केले जाते. शेखर गायकवाड म्हणाले, प्रशासकीय काम करताना ग्रामीण जीवनाचे अनेक पदर अनुभवायला मिळतात. वास्तव,भाषा, संस्कृती झपाट्याने बदलत आहे. या बदलाचे प्रतिबिंब साहित्यावर पडायला हवे.
कोरे म्हणाले, ‘‘ समाजरचना बदलण्याचे काम सहकार चळवळीने केले. मात्र, या चळवळीवर सकारात्मक पद्धथीने झालेले लिखाण अपवादात्मक रितीनेच पहायला मिळेल. बदलती सामाजिक, राजकीय व्यवस्था लक्षात घेता भविष्यात साहित्यिकांना मोठे योगदान द्यावे लागणार आहे.
भगत यांनी समाजातील बदलावर नेमके भाष्य केले. ते म्हणाले, समाज बदलत आहे. माणुस नव्याने विचार करु लागला आहे. आता यापुढे जाउन जातीभेद नष्ट करण्याची, त्यासाठी साहित्यातुन जाग्रुती करण्याची गरज आहे. वैज्ञानिक आव्हाने पेलण्याचे बौध्दिक सामर्थ्य समाजात निर्माण करण्याची गरज आहे. पुरुषोत्तम काळे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Production of literature from the movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.