कपाशीचा पेरा घटला तरीही उत्पादन वाढणार
By admin | Published: October 4, 2015 03:25 AM2015-10-04T03:25:46+5:302015-10-04T03:25:46+5:30
राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात यावर्षी कपाशीचे लागवड क्षेत्र (पेरा) कमी झाले असले तरी कापसाचे उत्पादन मात्र गतवर्षी एवढेच भरघोस होणार आहे. कारण कपाशीच्या पिकाची
यवतमाळ : राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात यावर्षी कपाशीचे लागवड क्षेत्र (पेरा) कमी झाले असले तरी कापसाचे उत्पादन मात्र गतवर्षी एवढेच भरघोस होणार आहे. कारण कपाशीच्या पिकाची स्थिती उत्तम आहे. नोव्हेंबर ते जानेवारी पाऊस झाल्यास ही पीक परिस्थिती आणखी सुधारणार असल्याचे सांगितले जाते.
गेली काही वर्ष कपाशीचे क्षेत्र स्थिर होते. नंतर त्यात घट झाली. यावर्षी कपाशीचे लागवड क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत आणखी कमी झाले. गुजरातमध्ये पाऊस कमी झाल्याने पाच ते दहा टक्के तर कर्नाटकात ३0 ते ४0 टक्के पेरा कमी झाला आहे.
मध्यप्रदेशात गतवर्षी एवढेच लागवड क्षेत्र आहे. आंध्रा-तेलंगणामध्ये पेरा कायम आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणामध्ये हे क्षेत्र दहा टक्के घटले आहे. महाराष्ट्रातसुद्धा कपाशीच्या लागवडीत घट झाली. सर्वत्र हे क्षेत्र घटले असले, तरी कपाशीचे उत्पादन मात्र आवश्यकतेच्यावेळी आलेल्या समाधानकारक पावसामुळे वाढणार आहे. विदर्भात कपाशीची सर्वात चांगली स्थिती सांगितली जाते. मराठवाड्यात अलीकडे आलेल्या पावसामुळे ४0 ते ५0 टक्के पिकांना जीवदान मिळाले.
शेजारच्या आंध्रा व तेलंगणातसुद्धा कपाशीचे जोरदार पीक होईल. कपाशीची स्थिती पाहता यावर्षी देशात ३ कोटी ८0 लाख रुईगाठी तयार होतील, एवढा कापूस पिकणार असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून दाव्याने सांगितले जात आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये हलकासा पाऊस आला तरी कापसाचे उत्पादन १0 ते २0 लाख गाठींनी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या वर्षी फरदळ कापूस फुटला नाही.