निर्बंधाविरोधात व्यावसायिकांचा ‘आवाज’, १५ आॅगस्टला लाउडस्पीकर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 04:14 AM2017-08-12T04:14:40+5:302017-08-12T04:14:44+5:30
लाउडस्पीकरवर लादण्यात आलेले आवाजाचे निर्बंध आणि पोलिसांकडून होणाºया मनमानी कारवाईविरोधात लाउडस्पीकर आणि लायटिंग व्यावसायिकांनी १५ आॅगस्टला बंद पुकारला आहे. लाउडस्पीकर आणि लायटिंग व्यावसायिकांच्या ‘प्रोफेशनल आॅडिओ अॅण्ड लायटिंग असोसिएशन’ने (पाला) शुक्रवारी पत्रकार परिषद घेत १५ आॅगस्टला राज्यव्यापी मूक दिन पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : लाउडस्पीकरवर लादण्यात आलेले आवाजाचे निर्बंध आणि पोलिसांकडून होणाºया मनमानी कारवाईविरोधात लाउडस्पीकर आणि लायटिंग व्यावसायिकांनी १५ आॅगस्टला बंद पुकारला आहे. लाउडस्पीकर आणि लायटिंग व्यावसायिकांच्या ‘प्रोफेशनल आॅडिओ अॅण्ड लायटिंग असोसिएशन’ने (पाला) शुक्रवारी पत्रकार परिषद घेत १५ आॅगस्टला राज्यव्यापी मूक दिन पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
कायद्याचा चुकीचा अर्थ लावल्याने होणाºया समस्यांविरोधात हा बंद पुकारल्याचे पालाचे अध्यक्ष रॉजर ड्रेगो यांनी सांगितले. ड्रेगो म्हणाले की, अवघ्या ७५ डेसिबलचे बंधन सरकारने लाउडस्पीकरवर लादले आहे. याउलट स्वत: सरकारी यंत्रणा गणेशोत्सवादरम्यान चौपाट्यांवर आवाहन करताना या मर्यादेचे उल्लंघन करतातत्र असा आरोपही त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार
पालाचे सदस्य सिद्धार्थ मोरे यांनी पुण्यातील व्यावसायिकांनी शुक्रवारपासून पुकारलेल्या बंदला हाक देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणाºया कार्यक्रमाच्या आयोजनावर बहिष्कार घातला आहे. दरवर्षी शनिवारवाड्यात पार पडणाºया या कार्यक्रमातील लाउडस्पीकर आणि लायटिंगचे कंत्राट मोरे यांच्याकडे असते. मात्र संघटनेने पुकारलेल्या बंदमध्ये सामील होत पुण्यातील कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचे मोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पालाची मागणी : पालाने केलेल्या मागणीनुसार, सरकारने कार्यक्रमाठिकाणी असलेल्या आवाजाहून किमान १० डेसिबल आवाज अधिक ठेवण्याची परवानगी देण्याचा निर्णय घ्यावा. काही ठिकाणी परवानगी देतानाही पोलिसांकडून अडवणूक केली जात आहे. पोलीस कोणत्याही कार्यक्रमाआधी घरी येऊन लाउडस्पीकर जप्त करून नेत असल्याचा आरोप पालाने केला आहे.