नक्षलींशी संबंध ठेवल्याप्रकरणी प्राध्यापक साईबाबांना जन्मठेप

By Admin | Published: March 7, 2017 03:25 PM2017-03-07T15:25:17+5:302017-03-07T15:43:41+5:30

नक्षलवाद्यांशी संबंध ठेवल्याप्रकरणी प्राध्यापक गोकराकोंडा नागा साईबाबा यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे

Professor Saibaba has been given life imprisonment in connection with the nexus | नक्षलींशी संबंध ठेवल्याप्रकरणी प्राध्यापक साईबाबांना जन्मठेप

नक्षलींशी संबंध ठेवल्याप्रकरणी प्राध्यापक साईबाबांना जन्मठेप

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 7 - नक्षलवाद्यांशी संबंध ठेवल्याप्रकरणी प्राध्यापक गोकराकोंडा नागा साईबाबा यांना न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. साईबाबा यांच्यासह अन्य पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रा. गोकराकोंडा नागा साईबाबा यांच्यासह प्रशांत राही, हेम मिश्रा, विजय तिरकी, महेश तिरकी आणि पांडू नरोटे यांना देशविघातक कृत्य, बंदी संघटनांचा सदस्य असणे, प्रचार करणे आदी गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत न्यायालयाने शिक्षा सुनावली. विजय तिरकी यांना 10 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
 
साईबाबा यांचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने हा खटला दररोज चालवण्याचे आदेश दिले होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. मात्र सुनावणी दरम्यान गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलं. न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 
 
साईबाबा हा दिल्ली विद्यापीठाच्या रामलाल आनंद महाविद्यालयात इंग्रजीचा प्राध्यापक आहे. अहेरी पोलिसांनी त्याला राज्य शासनाने बंदी घातलेल्या सीपीआय-मोवोवादी संघटनेचा सदस्य असल्याच्या कारणावरून ९ मे २०१४ रोजी अटक केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणाची स्वत:हून दखल घेतल्यानंतर साईबाबाला ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत तात्पुरता जामीन मंजूर केला होता. यामुळे त्याला सोडण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने साईबाबाला जामीन कायम करण्यासाठी नागपूर खंडपीठात अर्ज करण्यास सांगितले होते. त्यानुसार साईबाबाने ऑक्टोबर २०१५ मध्ये नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला होता.
 
हा अर्ज फेटाळण्यात आला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी हेम मिश्राला अटक झाल्यानंतर साईबाबाला अटक करण्यात आली होती. मिश्रा हा साईबाबा व छत्तीसगडमधील मावोवादी यांच्यात माहितीची आदान-प्रदान करीत होता असे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. साईबाबातर्फे वरिष्ठ वकील रेबेका जॉन (सर्वोच्च न्यायालय), अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग व अ‍ॅड. हर्षल लिंगायत तर, शासनातर्फे मुख्य सरकारी वकील भारती डांगरे व सहायक सरकारी वकील अनिल लद्धड यांनी कामकाज पाहिले. 
 

Web Title: Professor Saibaba has been given life imprisonment in connection with the nexus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.