दोन कोटी नव्हे, तब्बल १,१६० कोटींचा नफा

By admin | Published: April 12, 2016 03:04 AM2016-04-12T03:04:16+5:302016-04-12T03:04:16+5:30

महाराष्ट्र सदन इमारत बांधकामाचा खर्च २००६ मध्ये २०५ कोटी रुपये आणि त्याच्या विकासकाला (डेव्हलपर) फक्त दोन कोटी रुपयेच (१.३३ टक्के) नफा मिळेल, असे पायाभूत विभागाच्या उपसमितीसमोर

Profit of Rs 1,160 crore, not two crore | दोन कोटी नव्हे, तब्बल १,१६० कोटींचा नफा

दोन कोटी नव्हे, तब्बल १,१६० कोटींचा नफा

Next

- डिप्पी वांकाणी,  मुंबई
महाराष्ट्र सदन इमारत बांधकामाचा खर्च २००६ मध्ये २०५ कोटी रुपये आणि त्याच्या विकासकाला (डेव्हलपर) फक्त दोन कोटी रुपयेच (१.३३ टक्के) नफा मिळेल, असे पायाभूत विभागाच्या उपसमितीसमोर सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात के. एस. चमणकर इंटरप्रायजेसने विक्रीयोग्य जमिनीपैकी २७ टक्के भाग विकून तब्बल १,१६०.९९ कोटी रुपये नफा कमावला होता. २०११ मध्ये ही जमीन चमणकर इंटरप्रायजेसला दिली गेली होती. ही माहिती एल अँड टी एशियन रियल्टी प्रोजेक्ट, एलएलपीचे प्रकल्प प्रमुख सुधीर कुलकर्णी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या निवेदनात दिली आहे.
हे निवेदन आरोपपत्राचा भाग बनविण्यात आले आहे. आरोपपत्रात म्हटले आहे की एल अँड टीने हा प्रकल्प चमणकर्स आणि प्राईम डेव्हलपर्स यांच्याकडून आपल्याकडे घ्यायच्या आधी त्याचे मूल्यांकन करण्याचे काम कुशमॅन अँड वेकफिल्डकडे दिले होते. कंपनीला या प्रकल्पातून करपूर्व नफा ८५० कोटी रुपये होईल, असे म्हटले होते. याच प्रकल्पाचा स्टेटस रिपोर्ट समितीला सादर करण्यात आला असून तोदेखील आता आरोपपत्राचा भाग करण्यात आला आहे. आरोपपत्रात म्हटले आहे की विकासकाला या प्रकल्पाचा खर्च २०५.५१ कोटी रुपये येणार असून मोबदल्यात देण्यात आलेल्या जमिनीच्या विक्रीतून २०७.९० कोटी रुपये मिळतील याचा अर्थ प्रत्यक्षात नफा केवळ १.३३ टक्केच असेल.
कुलकर्णी यांनी ५ फेब्रुवारी २०१६ रोजी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की प्रकल्पांतर्गत विक्रीयोग्य एरिया २५.७० लाख चौ.फू. होता आणि एकूण महसूलाची विभागणी के. एस. चमणकर इंटरप्रायजेस २७ टक्के, प्राईम बिल्डर्स ४.४ टक्के आणि एल अँड टी ६८.६ टक्के अशी झाली होती. कुलकर्णी म्हणाले की ४३०० कोटी रुपयांच्या महसुलात एल अँड टी एलएलपीचा भाग २,९५० कोटी रुपयांचा होता आणि एल अँड टीला येणारा खर्च २,१०० कोटी रुपये अपेक्षित होता.
२०११ मध्ये त्रिपक्षीय करार करण्यापूर्वी एल अँड टीने कुशमॅन अँड वेकफिल्डला प्रकल्पाच्या मूल्यांकनाचे काम दिले होते. त्यांचा निष्कर्ष प्रत्येक चौरस फुटाची विक्री किमत १६,७३१.५१ रुपये असा निघाला. सुधीर कुलकर्णी पुढे म्हणाले की एल अँड टीने ८५ टक्के लोडिंग फॅक्टर गृहीत धरला होता आणि त्यानुसार कराराप्रमाणे मेसर्स के. एस. चमणकर इंटरप्रायजेसला विक्रीयोग्य एरियापैकी ६९३९०० चौरस फूट द्यायचे होते. त्यातून त्यांना एक रुपयाचाही खर्च न करता १,१६०.९९ कोटी रुपये मिळाले.

प्रकल्पात एल अँड टीने किती पैसे अदा केले
के. एस. चमणकर इंटरप्रायजेस - रुपये : १२३,१०,००,०००
मे. प्राईम बिल्डर्स - रुपये : ३५४,९१,००,२९१
झोपडपट्टीवासीयांना - रुपये : ३९,६०,९०२
एकूण रुपये - ४७८,४०,६११९३

मूल्यांकनात प्रत्येक चौरस फुटाची विक्री किमत १६,७३१.५१ रुपये असा निष्कर्ष निघाला.
एल अँड टीने ८५ टक्के लोडिंग फॅक्टर गृहीत धरला होता आणि त्यानुसार कराराप्रमाणे मेसर्स के. एस. चमणकर इंटरप्रायजेसला विक्रीयोग्य एरियातून १,१६०.९९ कोटी रुपये मिळाले.

Web Title: Profit of Rs 1,160 crore, not two crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.