शिक्षणातूनच प्रगती साधता येते
By admin | Published: November 2, 2016 02:31 AM2016-11-02T02:31:38+5:302016-11-02T02:31:38+5:30
आदिवासी पाड्यात आदर्श सेवाभावी संस्था आणि खारघर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीनिमित्त विशेष भेट देण्यात आली
नवी मुंबई : खारघरमधील घोलवाडी आदिवासी पाड्यात आदर्श सेवाभावी संस्था आणि खारघर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीनिमित्त विशेष भेट देण्यात आली. यावेळी शिक्षणाचे महत्त्व सांगताना शिक्षणातूनच जीवनात प्रगती करता येत असल्याने मुलांना चांगले शिक्षण देण्याचा मोलाचा सल्ला पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आदिवासी बांधवांना दिला.
यावेळी समाजाला पुढे नेण्यासाठी शिक्षणाचा मार्ग अवलंबिण्याचा सल्ला देण्यात आला. मुलांबरोबरीनेच घरातील मुलींनाही शिक्षणाची वाट मोकळी करून देण्याविषयी जनजागृतीही या माध्यमातून करण्यात आली. यावेळी तुळशीराम दळवी, दत्ता दळवी यांच्या वतीने आदिवासी कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तंूचे वितरण करण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त अरविंद साळवे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड, किरण पाटील, खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे, आदर्श सेवाभावी संस्थेचे शिवाजी जाधव, गजानन चव्हाण, संतोष ठाकूर, यज्ञेश मढवी, शैलेश साळवे, मंगेश घरत, बाबू मढवी आदी मान्यवर उपस्थित होते.