संविधानामुळेच देशाची प्रगती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 03:00 AM2018-04-15T03:00:21+5:302018-04-15T03:00:21+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीयांना संविधानाचा अमूल्य ठेवा दिल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार मिळाला आहे. आज देश प्रगतीकडे जात आहे त्याचे कारण आपले ‘संविधान’ आहे.
नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीयांना संविधानाचा अमूल्य ठेवा दिल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार मिळाला आहे. आज देश प्रगतीकडे जात आहे त्याचे कारण आपले ‘संविधान’ आहे. यासाठी प्रत्येक भारतीयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आपले कर्तव्य बजवावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
बाबासाहेबांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर नंदा जिचकार, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे,आदी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर आधारित राज्याची रचना व वाटचाल सुरू राहील. संविधानरुपी दिलेल्या प्रगती पथावरून राज्याचा विकाररथ पुढे जात असल्याचे नमूद करुन फडणवीस यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, नागपूर शहरात डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांनी अनेक ठिकाणी मिरवणुका काढल्या. नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायी जमले होते.