मान्सूनच्या वाटचालीत प्रगती; बंगालच्या उपसागरात दाखल
By admin | Published: May 19, 2017 01:22 AM2017-05-19T01:22:16+5:302017-05-19T01:22:16+5:30
मान्सूनच्या वाटचालीत आणखी प्रगती झाली असून आग्नेय बंगालचा उपसागर, पूर्व मध्य बंगालचा उपसागर व उत्तर अंदमान सागराच्या सर्व भागात गुरुवारी मान्सूनचे आगमन झाले़
- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मान्सूनच्या वाटचालीत आणखी प्रगती झाली असून आग्नेय बंगालचा उपसागर, पूर्व मध्य बंगालचा उपसागर व उत्तर अंदमान सागराच्या सर्व भागात गुरुवारी मान्सूनचे आगमन झाले.
मान्सूनचे सर्वसाधारणपणे २० मेपर्यंत अंदमान, बंगालच्या उपसागरात आगमन होते.
यंदा मान्सूनने ही रेषा १८ मे रोजीच ओलांडून पुढे आगेकूच केली आहे़ पुढील ४ ते ५ दिवस मान्सून या भागात स्थिर राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.
राज्यात गुरुवारी सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४६़२
अंश सेल्सिअस, तर सर्वांत कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १९़५ अंश सेल्सिअस इतके
नोंदविले गेले़ विदर्भासह ओडिशा, आंध्र प्रदेश किनारपट्टी व तामिळनाडू येथे तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे़ विदर्भात शुक्रवारीदेखील पारा असाच चढा राहील, असा अंदाज आहे.
राज्यातील प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे ३८़४, जळगाव ४२़७, कोल्हापूर ३८़१, महाबळेश्वर ३१़७, मालेगाव ४३़२, नाशिक ३७़८, सांगली ३८़१, सातारा ३९़७, सोलापूर ४२़७,
मुंबई ३४़१, अलिबाग ३६़२, रत्नागिरी ३४़५, पणजी ३५़१, डहाणू ३५़४, औरंगाबाद ४०़६, परभणी ४३, नांदेड ४३, अकोला ४३़८, अमरावती ४२़८, बुलडाणा ४०़५, ब्रह्मपुरी ४६,
चंद्रपूर ४६़२, गोंदिया ४४, नागपूर
४५, वाशिम ४१़२, वर्धा ४४़९ व यवतमाळ ४२़५़