दलित अत्याचाराचा रास्ता रोकोने निषेध
By admin | Published: May 10, 2014 06:52 PM2014-05-10T18:52:44+5:302014-05-10T18:52:44+5:30
दलितांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ विविध संघटनांतर्फे रास्ता रोको करून तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
नंदुरबार : दलितांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ विविध संघटनांतर्फे रास्ता रोको करून तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन निषेध व्यक्त करण्यात आला. जिल्हाधिकार्यांनाही निवेदन देण्यात आले. राज्यात विविध ठिकाणी होणार्या या घटनांबाबत निषेध व्यक्त करण्यात आला. रिपाइंतर्फे हे आंदोलन करण्यात आले. कोरीट चौफुलीवर दुपारी काही काळ रास्ता रोको करण्यात आला. या वेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दलितांवर अन्याय, अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. अत्याचारातून बहिष्कार टाकण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. दलित युवकांच्या महिनाभरापासून झालेल्या हत्यांमुळे पुरोगामी महाराष्टÑाला लाजीरवाण्या आहेत. यामुळे राज्यातील ग्रामीण भागातील दलित समाज धास्तावलेला आहे. आरोपींना तत्काळ जेरबंद करून त्यांना शिक्षा केली पाहिजे. त्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात अशा केसेस चालविल्या पाहिजे, अशी मागणीही करण्यात आली. या वेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, उपाध्यक्ष भीमराव अहिरे, प्रवीण बिरारी, राम साळुंखे, अनिल कुवर, सुभाष पानपाटील, राजेंद्र बिरारे, कृष्णा साळवे, बापू महिरे, प्रल्हाद शिरसाठ, प्रकाश ठाकरे, दीपक सामुद्रे, योगेश अल्हाट यांच्यासह रिपाइंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.