राहुल गांधींच्या अटकेचा निषेध

By admin | Published: November 4, 2016 01:26 AM2016-11-04T01:26:33+5:302016-11-04T01:26:33+5:30

राहुल गांधी यांच्या अटकेचा इंदापूर व पुरंदर तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी निषेध केला आहे.

Prohibition of Rahul Gandhi's arrest | राहुल गांधींच्या अटकेचा निषेध

राहुल गांधींच्या अटकेचा निषेध

Next


पुरंदर/इंदापूर : राहुल गांधी यांच्या अटकेचा इंदापूर व पुरंदर तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी निषेध केला आहे. पुरंदर तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाविरोधी घोषणाबाजी करीत निषेध मोर्चा काढण्यात आला.
सासवड येथील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयापासून नगरपालिका चौकातील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या वेळी शासनाच्या विरोधी घोषणाबाजी केली. या वेळी प्रदीप पोमण, बारामती लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन दुर्गाडे, युवकचे तालुकाध्यक्ष विकास इंदलकर, सागर जगताप, माजी नगरसेवक जितेंद्र जगताप, भगवान राऊत, महेंद्र घोडके, सचिन निकुडे आदींनी मनोगतातून शासनाचा निषेध केला.
या प्रसंगी नगरसेवक अजित जगताप, मनोहर जगताप, यशवंतकाका जगताप, कुंडलिक जगताप, पै मोहनअप्पा जगताप, पिनू काकडे, रोहित इनामके, सागर घाटगे, मुन्ना शिंदे, विठ्ठलराव मोकाशी, धर्माजी गायकवाड, भारत चौखंडे, नंदकुमार जगताप, तुषार ढुमे, चेतन महाजन, सुदर्शन कुदळे, विकी रणनवरे, मार्तंड भोंडे, हारून बागवान, सुरेश रणपिसे, संदीप फडतरे,
कैलास धिवार, सचिन भोंडे यांसह काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
>माजी सैनिकाच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्या नातेवाइकांना अटक केल्याबद्दल सवाल उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींनाच अटक करण्याची केंद्र शासनाची कृती म्हणजे लोकशाहीचा घोर अपमान आहे, अशी भावना इंदापूरमधील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. कृष्णाजी यादव, शहराध्यक्ष गोरख शिंदे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शेखर पाटील, तुकाराम जाधव, सुधीर मखरे, राजकुमार राऊत,अबुल पठाण, जनार्दन जगताप, जालिंदर गार्डे, किशोर राऊत, बजरंग करे व इतर कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

Web Title: Prohibition of Rahul Gandhi's arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.