प्रकल्पग्रस्त शेतकरी नोकरीपासून वंचित
By admin | Published: April 26, 2016 04:22 AM2016-04-26T04:22:15+5:302016-04-26T04:22:15+5:30
मुंबई महानगरपालिकेची तहान भागवणाऱ्या पाइपलाइन व धरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादित करून घेतल्या,
अनगाव : मुंबई महानगरपालिकेची तहान भागवणाऱ्या पाइपलाइन व धरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादित करून घेतल्या, त्या प्रकल्पग्रस्त १५५ शेतकऱ्यांना नोकऱ्यांमध्ये सामावून न घेतल्याने तालुक्यातील शेतकरी आजही नोकरीपासून वंचित आहेत.
मुंबई मनपाला पाणीपुरवठा करण्यासाठी तालुक्यातील पांजरापूर, शहापूरमधील भातसा ही धरणे तयार केली. त्याकरिता, स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या व शासनाने त्याच्या मोबदल्यात मुंबई महापालिकेत त्यांना नोकऱ्या देण्याचे मान्य केले. अनेक वर्षे उलटूनही प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळाल्या नसल्याने ते त्रस्त झाले आहेत. काही शेतकऱ्यांचे वयही उलटून गेले आहे. त्यामध्ये मनपा प्रशासनाने प्रकल्पग्रस्त बाधितांना लावलेल्या जाचक अटी व नियम शिथिल करून त्यांना नोकरीत सामावून घेण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)